Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगएसटी बँकेत महाभूकंप, 12 संचालकांचा तडकाफडकी राजीनामा; गुणरत्न सदावर्ते यांना प्रचंड मोठा...

एसटी बँकेत महाभूकंप, 12 संचालकांचा तडकाफडकी राजीनामा; गुणरत्न सदावर्ते यांना प्रचंड मोठा धक्का

 

 

प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी महामंडळातील अस्तित्वाला फार मोठा धक्का बसला आहे. एसटी महामंडळाच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये महाभूकंप झाला आहे. एसटी बँकेच्या 19 पैकी 12 संचालकांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का बसला आहे. या राजीनामा सत्रामुळे एसटी महामंडळातील सदावर्ते यांचं वर्चस्व खालसा झालं आहे. या राजीनामा सत्रामुळे एसटी महामंडळात एकच खळबळ उडाली आहे.एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी आधी कर्मचाऱ्यांचं वकीलपत्र घेतलं. त्यानंतर त्यांनी या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व केलं. त्यानंतर एसटी महामंडळाच्या निवडणुकांमध्ये आपलं पॅनलही उतरवलं. गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलने एसटी बँकेची संचालक मंडळाचा निवडणूक लढवली. या निवडणुकीत सदावर्ते यांच्या पॅनलला 19 पैकी 12 जागांवर विजय मिळाला. मात्र, कुरबुरी काही थांबेनात. अखेर या कुरबुरीचा कडेलोट झाला.

 

थोडी ना थोडकी…

एसटी बँकेच्या 19 पैकी 12 संचालकांनी पदाचा राजीनामा दिला आहे. या सर्व संचालकांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलला सोड चिठ्ठी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. हे सर्वच्या सर्व 12 संचालक ट्रॅव्हलरमधून एसटी बँकेत पोहोचले. यावेळी त्यांनी सोबत राजीनामा पत्रही आणलं होतं. या संचालकांनी एसटी महामंडळाचे अतिरिक्त संचालक बिमनवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्याचं वृत्त आहे. या 12 संचालकांनी राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. आता एसटी बँकेत पुन्हा एकदा निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.घोटाळ्याचा आरोप

स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक अर्थात एसटी बँकेत 450 कोटींचा घोटाळा झाल्याचा संचालकांचा आरोप आहे. त्यामुळे संचालकांनी हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. यापूर्वीच 14 संचालक नॉट रिचेबल झाले होते. त्यानंतर आज या संचालकांनी थेट राजीनामा अस्त्र उगारल्याने सदावर्ते यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. या निमित्ताने संचालकांचा सदावर्ते यांच्यावर विश्वास नसल्याचंही अधोरेखित झालं आहे.

 

सामंत यांची भेट

दरम्यान, या बाराही संचालकांनी यापूर्वी उद्योगमंत्र उदय सामंत यांची भेट घेतली होती. उदय सामंत यांची भेट घेऊन त्यांनी सामंत यांना पाठिंबा जाहीर केला होता. तर, काही दिवसांपूर्वीच गुणरत्न सदावर्ते यांनीही सपत्नीक उदय सामंत यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर या घडामोडी घडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून राजकीय कयास लावले जात आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -