ताजी बातमी /online team
कोल्हापूर:
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर अखत्यारित सैनिकी मुलींच्या वसतिगृहाकरिता अतिरिक्त अशासकीय सहाय्यक वसतिगृह अधीक्षिका पद तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने व एकत्रित मानधनावर भरण्यात येणार आहे. या पदासाठी युध्द विधवा व माजी सैनिक विधवा यांना प्रथम प्राधान्य राहील.
इच्छुकांनी आपले अर्ज दिनांक 15 जानेवारी 2024 पर्यंत सैनिकी मुलींचे वसतिगृह, कोल्हापूर (जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर) येथे कार्यालयीन वेळेत जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल राहुल माने (निवृत्त) यांनी केले आहे.
उमेदवार निवडीचे सर्व अधिकार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, कोल्हापूर यांना राहतील. इतर अटी, शर्ती व सविस्तर माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे दुरध्वनी क्रमांक 0231-2665812 वर संपर्क साधावा, असेही ले. कर्नल श्री. माने (निवृत्त) यांनी कळविले आहे.