Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगसरकारची मोठी घोषणा ! आता फक्त 450 रुपयांना मिळणार गॅस सिलिंडर

सरकारची मोठी घोषणा ! आता फक्त 450 रुपयांना मिळणार गॅस सिलिंडर

! आता  दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे. महागाई वाढत असताना (Gas cylinder) गॅस सिलिंडरच्या किमती देखील वाढल्या आहेत. त्यामुळे देशातील नागरिक हैराण झाले आहेत.

 

मात्र आता सरकारकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. आता सरकारकडून महिलांना नवीन वर्षात 450 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर (Gas cylinder) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

1 जानेवारी 2024 पासून अनेक नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. त्यामुळे काही राज्यातील नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे तर काही राज्यातील नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सरकारकडून महिलांना कमी किमतीत गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राजस्थानचे नवे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी निवडणुकीमध्ये निवडणुकीपूर्वी महिलांना 450 रुपयांचे एलपीजी सिलिंडर देण्याचे वाच दिले होते. आता सरकारकडून गरजू महिलांना 450 रुपयांमध्ये एलपीजी सिलिंडर देण्याचा निर्णय घेतला आहे.

 

सरकारच्या अनुदान योजनेमध्ये गरीब आणि गरजू महिलांना कमी किमतीत गॅस सिलिंडर दिला जाणार आहे. ज्या महिलांना या गॅस सबसिडी योजनेचा लाभ घेईचा आहे अशा महिलांना नोंदणी करावी लागणार आहे.

 

यापूर्वी गॅस सिलिंडरची किंमत 500 रुपये होती

 

राजस्थानमध्ये भाजपचे सरकार येण्यापूर्वी काँग्रेसचे सरकार होते. काँग्रेस सरकारकडून महिलांना 500 रुपयांना गॅस सिलिंडर दिला जात होता. मात्र आता भाजप सरकार महिलांना 450 रुपयांत गॅस सिलिंडर देणार असल्याची घोषणा केली आहे. 1 जानेवारी 2024 पासून ही योजना लागू केली जाणार आहे.

 

450 रुपयांना गॅस सिलिंडर कोणाला मिळणार?

 

पीएम उज्ज्वला योजनेअंतर्गत एलपीजी कनेक्शन असलेल्या राज्यातील महिलांना 450 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर दिला जाणार आहे. तसेच काही बीपीएल कुटुंबांनाही या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. सध्या राजस्थानमध्ये गॅस सिलिंडरची किंमत 903 रुपये आहे.

 

450 रुपयांना सिलिंडर कसा मिळेल?

 

पीएम उज्ज्वला योजनेशी संबंधित आणि गॅस कनेक्शनवर सबसिडी मिळवणाऱ्या महिलांना गॅस सिलिंडर खरेदी करताना पूर्ण पैसे भरावे लागणार आहेत. त्यानंतर सरकारकडून बाकीचे पैसे महिलांच्या खात्यावर सबसिडी म्हणून जमा केले जाणार आहेत. सबसिडी अंतर्गत फक्त वर्षात 12 सिलिंडर दिले जाणार आहेत.

 

योजनेचा लाभ घेण्यासाठी, येथे नोंदणी करा

 

तुम्हालाही सरकारच्या गॅस सिलिंडर योजनेअंतर्गत 450 रुपयांचा सिलिंडर घेईल असेल तर तुम्हाला उज्ज्वला योजनेचा फॉर्म जवळच्या एलपीजी एजन्सीकडे जमा करावा लागेल. फॉर्म भरून दिल्यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्र जोडावी लागतील. त्यामुळे तुमची नोंदणी होऊन 450 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर मिळण्यास सुरुवात होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -