सांगलीतील एका नामांकित शिक्षण संस्थेत सहावीच्या वर्गातील विद्यार्थिनींसोबत चाळे करणाऱ्या शिक्षकालामनसे कार्यकर्त्यांनी चोप दिला. यामुळे शाळेत मोठी खळबळ माजली. शिक्षकाने चाळे केल्याची माहिती घाबरलेल्या विद्यार्थिनीने मैत्रिणींना दिली. त्यावेळी अन्य काही विद्यार्थिनींनीही आपल्यासोबतही सरांनी असेच कृत्य केल्याचे सांगितले.
ही बाब पालकांपर्यंत पोहोचली. त्यांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांना माहिती दिली. त्यानंतर सावंत पालकांसह शाळेत गेले. घडलेल्या प्रकाराचा जाब विचारला. मुख्याध्यापक, संस्थाचालक किंवा संबंधित शिक्षक समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत.शिक्षकाकडे सखोल विचारणा केली असता, त्याने प्रथम कानावर हात ठेवले, पण विद्यार्थिनींपुढे तोंड बंद ठेवले. त्यानंतर संतप्त पालक व मनसे कार्यकर्त्यांनी त्याला चांगलाच चोप दिला. शिक्षकाने माफी मागण्याचा प्रयत्न केला, पण कार्यकर्ते आक्रमक होते.
यावेळी महिला सेनेच्या सरोजा लोहगावे, जमीर सनदी, दयानंद मलपे, विठ्ठल शिंगाडे, अमित पाटील, संजय खोत, प्रकाश माळी, अमर औरादे, अनिकेत कुंभार, रोहित जाधव व पालक उपस्थित होते.शिक्षकाला कमी करणारयाबाबत तानाजी सावंत म्हणाले, घडलेला प्रकार अतिशय निंदनीय आहे. पालक व विद्यार्थिनी भितीच्या छायेखाली आहेत. अशा विकृत शिक्षकांमु iiळे मुली शाळेत पाठवायला पालक घाबरत आहेत.
हा विकृत शिक्षक निलंबित होईपर्यंत मुलींना शाळेत पाठवणार नाही असा पवित्रा पालकांनी घेतला आहे. संस्थेच्या अध्यक्षांकडे मनसेने तशी मागणी केली आहे. संस्थेनेही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षकाला सेवेतून करण्याचा निर्णय घेतला आहे.