Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगप्रभू राम यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य, जितेंद्र आव्हाड पक्षातही एकाकी

प्रभू राम यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य, जितेंद्र आव्हाड पक्षातही एकाकी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. श्रीराम मांसाहारी होते, असे वक्तव्य शिर्डीत त्यांनी केल्यानंतर विरोधकांबरोबर स्वपक्षीयांकडूनही ते अडचणीत आले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यानंतर आमदार रोहित पवार यांनी त्यांनी घरचा आहेर दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट चांगलाच आक्रमक झाला. त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर आंदोलन केले. त्यावेळी शरद पवार गटाकडून विरोध झाला. परंतु आता आमदार रोहित पवार यांनी त्यांना विरोध केला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशध्यक्ष जयंत पाटील यांनीही बुधवारी शाकाहारी आणि मांसाहारी असा भेद करण्याची गरज नाही, असे खडे बोल आव्हाड यांनी सुनावले होते.

काय म्हणाले रोहित पवार

जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर रोहित पवार यांनी ट्विट केले आहे. त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना घरचा आहेर दिला आहे. त्यांनी दिलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जाती-जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -