Payment : ऑनलाइन पेमेंट (Online UPI payment) करणाऱ्यांना केंद्र सरकारने (Central Govt) नवीन वर्षात मोठी भेट दिली आहे. सध्या, सर्वत्र ऑनलाइन पेमेंटचा भरपूर वापर केला जात आहे. परंतू, ऑनलाइन पेमेंट सुलभ करण्यात एक मोठी समस्या होती ती म्हणजे निर्धारित मर्यादा. सरकारने एका दिवसात 1 लाख रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर बंदी घातली होती.
मात्र, आता नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI ने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने म्हणजेच RBI ने या समस्येवर उपाय शोधला आहे. आता 5 लाख रुपयांचे UPI पेमेंट एकावेळी करता येणार आहे. मात्र, यामध्ये काही अटी आहेत. ज्या सर्व वापरकर्त्यांना माहित असणं आवश्यक आहे.एकाच वेळी 5 लाख रुपयांचे UPI पेमेंट करता येणार
ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. केंद्र सरकारनं नवीन वर्षात मोठी भेट दिली आहे. आता एकाच वेळी 5 लाख रुपयांचे UPI पेमेंट करता येणार आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने या समस्येवर उपाय शोधला आहे. आता तुम्ही हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्थांसाठी 5 लाख रुपयांचे ऑनलाइन पेमेंट करू शकाल.
मर्यादा 1 लाख रुपयांवरुन 5 लाखांपर्यंत वाढवली
एनपीसीआयने रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांसारख्या अत्यावश्यक संस्थांच्या पेमेंटसाठी एकावेळी 5 लाख रुपयांच्या ऑनलाइन पेमेंटमध्ये सूट दिली आहे. हा नवा नियम 10 जानेवारीपासून लागू होणार आहे. यानंतर, वापरकर्ते सर्व शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयांचे बिल भरण्यासाठी एकावेळी जास्तीत जास्त 5 लाख रुपये भरू शकतील. यासाठी एनपीसीआयने बँका आणि पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर्सना अॅडव्हायजरी जारी केली आहे.
पेमेंट मर्यादा वाढवली
NPCI द्वारे व्यापाऱ्यांसाठी 1 लाख ते 5 लाख रुपयांची देय मर्यादा लागू केली जाईल. व्यापाऱ्याने वाढीव मर्यादेसह पेमेंट मोड म्हणून UPI सक्षम करणे आवश्यक आहे. सध्या, नॅशनल पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडिया (NPCI) द्वारे UPI पेमेंट मर्यादा 1 लाख रुपये प्रतिदिन ठेवली आहे. मागील पतधोरण आढावा बैठकीत RBI ने 5 लाख रुपये पेमेंट मर्यादा प्रस्तावित केली होती. यामुळे Paytm, Google Pay आणि PhonePe सारख्या पेमेंट अॅप्सना फायदा होईल.
UPI पेमेंटमध्ये भारत आघाडीवर जर आपण UPI पेमेंटबद्दल बोललो तर, 2023 मध्ये भारत UPI पेमेंटच्या बाबतीत 100 अब्जचा टप्पा पार करेल. या संपूर्ण वर्षात 118 अब्ज रुपयांची UPI पेमेंट करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये 60 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.