राज्यासह देशभरात आता थंड वातावरण जाणवू लागलंय. सतत वाढत असलेल्या थंडीमुळे नागरिकांच्या अडचणीतही वाढ होताना दिसतेय. दिल्लीसह उत्तरेकडील सर्व राज्यांमध्ये दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. थंडीचा कडाका वाढत असून येत्या काही दिवसांमध्ये त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय उत्तर भारतात तीव्र थंडी आणि उत्तर प्रदेश तसंच बिहारमधील अनेक ठिकाणी पावसामुळे तापमानात सातत्याने घसरण होताना दिसून येतंय.
हवामान खात्याच्या म्हणण्याप्रमाणे, येत्या काही दिवसांत थंडीमध्ये आणखी वाढ होणार होण्याचा अंदाज आहे. याशिवाय येत्या दोन-तीन दिवसांत हिमाचल आणि उत्तराखंडमध्येही बर्फवृष्टीचा अंदाज आहे. दुसरीकडे 8 आणि 9 जानेवारीला दिल्लीत पाऊस पडण्याची शक्यता आहे. परिणामी यामुळे थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात थंडी वाढली असून राजधानीत थंडीच्या दिवसाची नोंद झाली आहे. डोंगराळ भागात सतत बर्फवृष्टी झाल्यानंतर त्याचा परिणाम मैदानी भागातही स्पष्टपणे दिसून येतात. दिल्लीत शुक्रवारी कोल्ड डे नोंदवण्यात आला.
यावेळी दिल्लीचं किमान तापमान सामान्यपेक्षा 5 अंश सेल्सिअसने कमी नोंदवण्यात आलं आहे. दिल्लीचं कमाल तापमान 14.6 अंश सेल्सिअस होते. याशिवाय पालम परिसरात सकाळी 8.30 वाजता 50 मीटरपर्यंत विसिबिलिटी नोंदवण्यात आलीये.
ढगाळ वातावरणामुळे कमी सूर्यप्रकाश आणि समुद्रसपाटीमुळे मुंबईत सध्याच्या घडीला असलेला हवेचा उच्च दाब आणि मुंबईतील प्रदूषित हवा ह्या तिघांच्या परिणामातून धुक्याचे मळभ सध्या मुंबईत जाणवत आहे. मुंबईत हे वातावरण उद्यापर्यंत म्हणजेच 7 जानेवारीपर्यंत असण्याची शक्यता जाणवते.