शिवसेना (Shiv Sena) कुणाची, उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची? (Eknath Shinde) मूळ शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह कुणाला देणार याची उत्तरं 2 फेब्रुवारीला मिळण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याबाबत महत्त्वाची सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं याकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
शिवसेना ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाने दिलेल्या शिवसेना पक्षाबाबतच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. याच याचिकेवर 2 फेब्रुवारीला महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगाने 17 फेब्रुवारी रोजी एक अंतिम निकाल शिवसेनेच्या वादावर दिला होता. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे गटाला दिले गेले होते. आयोगाच्या याच निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.