Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगयंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द होणार ? कारण काय वाचा सविस्तर

यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द होणार ? कारण काय वाचा सविस्तर

 

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावी आणि बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतली जाणार आहे. यंदा या परीक्षेसाठी झालेल्या विद्यार्थी नोंदणीतून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या दर वर्षीच्या तुलनेत वाढल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे यंदा अचानक संख्या का वाढली, याचा अभ्यास राज्य मंडळाकडून करण्यात येत आहे. राज्य मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे.

 

त्यानुसार बारावीची (सर्वसाधारण, द्विलक्ष्यी आणि व्यवसाय अभ्यासक्रम) परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत, तर दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च या कालावधीत होणार आहे. या परीक्षेसाठी अर्जनोंदणी प्रक्रिया ऑक्टोबरमध्ये सुरू करण्यात आली. दर वर्षी दहावीच्या परीक्षेसाठी सुमारे १५ लाख ७५ हजार विद्यार्थी, तर बारावीसाठी सुमारे १४ लाख ६० हजार विद्यार्थी नोंदणी करतात. गेल्या वर्षी दहावीच्या १५ लाख ६१ हजार विद्यार्थ्यांनी, तर बारावीच्या १४ लाख २८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शालेय शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांसाठी इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार घालण्यासंदर्भातील पत्र नागपूर विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष डॉ. माधुरी सावरकर यांना महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळातर्फे देण्यात आले. तसेच यापूर्वी मुख्यमंत्र्यांनाही पत्र देण्यात आले आहे.

त्यामुळे या बहिष्कारावर तोडगा न निघाल्यास यंदा परीक्षा कशा होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.शिक्षण संस्था चालकांच्या निवेदनात विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. यात प्रलंबित मागण्यांमध्ये राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा रिक्त जागा असून २०१२ पासून भरती प्रक्रिया झालेली नाही.

न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही हा प्रश्न प्रलंबित आहे. वेतनेतर अनुदानासंबंधीची भूमिका याबाबत निर्णय न झाल्याने शाळांची आर्थिक परिस्थिती खालावत आहे.आदी प्रश्न त्वरित मार्गी लावावे अन्यथा दहावी, बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार घालण्यात येईल, असे महाराष्ट्र शिक्षण संस्था महामंडळाचे कार्यवाह रवींद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. यावेळी महामंडळाचे नागपूर विभाग अध्यक्ष प्रा. अनिल शिंदे, कार्यवाह किशोर मासुरकर व राज्य कार्यकारिणी सदस्य अतुल घुडगे, आल्हाद भांडारकर यांची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -