अहमदनगर-अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर बीडच्या मांजरसुंब्या ससेवडी गावाजवळ भीषण अपघात घडला. कंटेनर व पिकपची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात पाचजण जागीच ठार झाल्याचा प्राथमिक माहिती आहे.मयतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून नेकनूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
कसा झाला अपघात?
ससेवाडी गावाजवळ कंटेनर आणि पिकअपची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून घटनास्थळी नागरीकांनी मोठी गर्दी केली. सध्या गाड्यामधून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मयत हे महाजनवाडी गावातील आहेत.
मृतांची नावे पुढीलप्रमाणे
प्रल्हाद सिताराम घरत (वय 63 रा. महाजनवाडी ता.जि.बीड)
नितिन प्रल्हाद घरत (वय 41 रा. महाजनवाडी ता जि.बीड)
विनोद लक्ष्मण सानप (वय 40 वर्ष रा. वाघिरा ता.पाटोदा जि.बीड) आणि कंटेनर मधील 2 जणांचा मृत्यू. एकुण 5 जण जागीच ठार झाल्याची माहिती आहे. दोघांची नावे अद्याप समजू शकली नाही.