Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंगयुद्धविराम संपताच इस्रायलचा हमासवर हवाई हल्ला; एका रात्रीत ९० लोकांचा मृत्यू, शेकडो...

युद्धविराम संपताच इस्रायलचा हमासवर हवाई हल्ला; एका रात्रीत ९० लोकांचा मृत्यू, शेकडो जखमी

 

 

इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघटना हमास यांच्यात ७ ऑक्टोबर २०२३ पासून घमासान युद्ध सुरू आहे. या युद्धामध्ये आतापर्यंत दोन्ही देशातील हजारो लोकांचा जीव गेला आहे.तर कित्येक लोक जखमी झाले आहेत. पॅलेस्टाईनमधून हमासचा पूर्णत: खात्मा करणार असा निर्धारच इस्रायलने केला आहे.

दरम्यान, आठवडाभरापूर्वी दोन्ही देशांनी युद्धाला विराम दिला होता.मात्र, ६ दिवसांच्या युद्धविरामानंतर गुरुवारी रात्री इस्रायलने पुन्हा हमावर एअरस्ट्राईक केला. इस्रायलने गाझा पट्टीतील हमासच्या (Israel Hamas War) अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यात ९० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर शेकडो जण जखमी झाले आहेत.

 

इस्रायलच्या हल्ल्यात गाझा पट्टीतील अनेक इमारती जमीदोस्त झाल्याची माहिती आहे. इजिप्तच्या सीमेजवळील रफाह येथील एक इमारतही उद्ध्वस्त झाल्याचं कळतंय. अचानक झालेल्या बॉम्बवर्षावानंतर पॅलेस्टाईनमधील लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

 

गाझा पट्टीत असलेली घरे सोडून मोठ्या संख्येने लोक सुरक्षित स्थळी जात आहेत. इस्रायली लष्कराने केलेल्या बॉम्बफेकीमुळे शुक्रवारी गाझामधील सर्व इंटरनेट आणि संपर्क सेवा बंद करण्यात आली आहे. या हल्ल्यानंतर गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने एक निवेदन जारी केलं आहे.यात असं म्हटले आहे की, इस्रायलने ७ ऑक्टोबरपासून सुरू केलेल्या युद्धात आतापर्यंत २३ हजारांहून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, ५ हजारांहून अधिक जखमी झाले आहेत. यातील निम्म्याहून अधिक मुले आणि महिलांची संख्या आहे.

 

दरम्यान, इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध तातडीने थांबवावे, अशी मागणी अनेक देशांकडून करण्यात आली आहे. गाझा पट्टीतील युद्धाविरोधात दक्षिण आफ्रिकेने खटला दाखल केला आहे. दक्षिण आफ्रिकेने इस्रायलवर नरसंहाराचे आरोप केले आहेत.

 

नेदरलँड्समधील हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात (ICJ) इस्रायलविरुद्धच्या खटल्याची सुनावणी सुरू झाली आहे. १५ न्यायाधीशांचे पथक यावर सुनावणी घेत आहेत. स्वतंत्र पॅलेस्टाईन राज्य निर्माण करणे हाच या समस्येवर उपाय आहे आणि त्यासाठी जगाने मदत केली पाहिजे, असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -