Tuesday, August 5, 2025
Homeब्रेकिंगसंभाजीनगर हादरले!! खेळण्यासाठी गेलेल्या 4 चिमुकल्यांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू

संभाजीनगर हादरले!! खेळण्यासाठी गेलेल्या 4 चिमुकल्यांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू

 

 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मनाला सुन्न करणारी घटना घडली आहे. वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथील एका तालावामध्ये बुडून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.बिस्वजित सुखदेव उपाध्याय कुमार, अफरोज जावेद शेख, जावेद शेख, अबरार जावेद शेख अशी या चार मुलांची नावे आहेत.

या घटनेची माहिती मिळतात पोलिस आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी त्वरीत मुलांना बाहेर काढून घाटे रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यानंतर मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

 

समोर आलेल्या माहितीनुसार, रांजणगाव शेणपुंजी येथे असलेल्या एका तलावामध्ये ही चार मुले पोहण्यासाठी गेली होती. मात्र पाण्याचा अंदाज न लागल्याने चारही मुले पाण्यात बुडाली. पुढे घटनेची माहिती मिळतात परिसरात गोंधळ उडाला. गावातील ग्रामस्थांनी स्थानिक पोलिसांना बोलावून घेतले. यानंतर घटनास्थळी आलेल्या अग्निशामक दलाने या चारही मुलांना पाण्यातून बाहेर काढले. तोपर्यंत या मुलांचा मृत्यू झाला होता.

 

यानंतर पोलिसांनी या मुलांच्या मृतदेहाला घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. सध्या या घटनेमुळे गावामध्ये शोककळा पसरली आहे. विचारही मुले दुपारी खेळायला जाण्यासाठी घराच्या बाहेर पडली होती. मात्र सायंकाळ झाली तरी ती घरी येत नसल्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. मुलांना शोधते ते तलावाजवळ पोहोचले. तेव्हा त्यांना तलावाजवळ मुलांचे कपडे दिसून आले. त्यानंतरच हा सर्व प्रकार उघडकीस आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -