UGC NET परीक्षेबद्दल अत्यंत मोठे आणि महत्वाचे अपडेट हे पुढे आले आहे. आता लवकरच या परीक्षेचा निकाल लागणार आहे. अगोदर निकालाची तारीख ही 10 जानेवारी 2024 होती.आता यूजीसी नेटचा निकाल हा 17 जानेवारी 2024 रोजी लागणार आहे. यूजीसी नेट परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) द्वारे घेण्यात आली.NTA ने डिसेंबर 2023 मध्ये देशभरातील तब्बल 292 शहरांमध्ये परीक्षा घेतली. या परीक्षेसाठी तब्बल 9,45,918 विद्यार्थी हे बसले होते.http://ugcnet.nta.nic.in वर आपल्याला या परीक्षेचा निकाल हा बघता येणार आहे. उमेदवार हे गेल्या कित्येक दिवसांपासून या परीक्षेच्या निकालाची आतुरतेने वाट पाहताना दिसले.शेवटी आता या परीक्षेचा निकाल हा 17 जानेवारी 2024 रोजी लागणार आहे. ही परीक्षा 83 विषयांमध्ये घेण्यात आलीये.