येत्या 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी संपूर्ण देशात अर्ध्या दिवसाची सुट्टी देण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून याच नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. याआधी यूपी-उत्तराखंडसह अन्य राज्यातील सरकारांनी 22 जानेवारीला सुट्टी जाहीर केलीय. विशेष म्हणजे 22 जानेवारीला देशातील अनेक राज्यात ड्राय डे असेल. दारु आणि भांग याची दुकान बंद राहतील. अयोध्यानगरी सजून तयार झाली आहे. तो ऐतिहासिक क्षण जवळ येतोय, ज्याची बऱ्याच वर्षांपासून प्रतिक्षा होती. देश राममय झाला आहे. 22 जानेवारीचा दिवस उत्सवासारखा साजरा करण्याची तयारी आहे.
जास्तीत जास्त लोकांना या ऐतिहासिक क्षणाच साक्षीदार बनता याव यासाठी सुट्टीची घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारांनी सुट्टीची घोषणा केल्यानंतर केंद्र सरकारने अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केलीय. लोकांमध्ये कंफ्यूजन हे आहे की, सुट्टीच्या आदेशाच कुठे आणि कसं पालन होणार? सोप्या भाषेत समजून घेऊया, 22 जानेवारीला कुठे काय सुरु राहिल आणि काय बंद?
उत्तर प्रदेशात सार्वजनिक सुट्टी
रामनगरी उत्तर प्रदेशचा मान आहे, त्यासाठी 22 जानेवारीला प्राण प्रतिष्ठेच्या वेळी यूपी सरकारने सर्वातआधी सुट्टीची घोषणा केली. 22 जानेवारीला यूपीमध्ये सार्वजनिक सुट्टी आहे. शाळा-कॉलेजेस बंद राहतील. बँकाही बंद असतील. दारु आणि भांगची दुकान सुद्धा बंद राहतील. खासगी कार्यालय सुरु राहतील.
या राज्यांकडूनही सुट्टीची घोषणा
अयोध्येत प्राण प्रतिष्ठा असल्याने मध्य प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा आणि गोव्यात सार्वजनिक सुट्टीची घोषणा करण्यात आली आहे. या राज्यांमध्ये शाळा-कॉलेजेस बंद राहतील. केंद्र सरकारने अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केलीय. त्यामुळे केंद्र सरकारची कार्यालय दुपारनंतर सुरु होतील. बँकानाही हा आदेश लागू होईल. गोव्यातील राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी पूर्ण दिवस सुट्टीची घोषणा केलीय. गोव्यात सर्व दारू आणि भांग दुकान बंद राहतील.