Tuesday, February 27, 2024
Homeब्रेकिंगबारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; सोमवारपासून विद्यार्थ्यांना मिळणार हॉल तिकीट

बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; सोमवारपासून विद्यार्थ्यांना मिळणार हॉल तिकीट

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. कारण, इयत्ता बारावीच्या (exams) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून, विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसण्यासाठी आवश्यक असलेले प्रवेशपत्र अर्थातच हॉल तिकीट कधीपासून मिळणार याचीही तारीख निश्चित करण्यात आली आहे. तेव्हा आता खऱ्या अर्थाने आता बारावीमधील विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीला लागण्याची गरज आहे.

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी / मार्च 2024 मध्ये घेतल्या जाणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षांचे (exams) हॉल तिकीट ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिले जाणार आहे. उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी सोमवार, 22 जानेवारी रोजी राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड केलेले हॉल तिकीट विद्यार्थ्यांना द्यावेत.

तसेच हॉल तिकीटसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही वेगळे शुल्क आकारू नये, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.या दरम्यान होणार बारावीची परीक्षा

राज्य मंडळाच्या सचिव डॉ. अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य मंडळाने बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार 21 फेब्रुवारी ते 23 मार्च या कालावधीत लेखी परीक्षा होणार आहे, तर तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 2 ते 20 फेब्रुवारी या दरम्यान घेतली जाणार आहे.

 

प्रवेशपत्रसाठी नाही लागणार कुठलेही परीक्षा शुल्क

कनिष्ठ महाविद्यालयांनी कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता प्रवेशपत्राची प्रत डाऊनलोड करून त्यावर प्राचार्यांचा शिक्का मारून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यायची आहे. प्रवेशपत्रात विषय, माध्यमाबाबत बदल असल्यास त्याच्या दुरुस्त्या शाळा- कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्यायच्या आहेत.

प्रवेशपत्रावरील विद्यार्थ्याचे नाव, छायाचित्र, स्वाक्षरी या बाबतच्या दुरुस्त्या शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून त्याची प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवायची आहे. छायाचित्र सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचे छायाचित्र चिकटवून प्राचार्यांनी त्यावर शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे. असेही सांगण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -