Tuesday, February 27, 2024
Homeब्रेकिंगबघता-बघता तो बेंचवर कोसळला..सायलेंट हार्ट ॲटकने विद्यार्थ्याचा क्लासमध्ये मृत्यू

बघता-बघता तो बेंचवर कोसळला..सायलेंट हार्ट ॲटकने विद्यार्थ्याचा क्लासमध्ये मृत्यू

आजकाल कमी वयातच लोकांना हार्ट ॲटक येण्याच्या घटनांमध्ये बरीच वाढ झाली आहे. देशभरात अशा दुर्दैवी मृत्यूच्याअनेक बातम्या समोर येतात. काही दिवसांपूर्वी एका मध्यमवयीन इसमाला रेस्टॉरंटमध्ये जेवतानाच हार्ट ॲटक आल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत एक व्यक्तीला ट्रेनमध्ये प्रवास करतानाच हार्ट ॲटक आला. त्याचा झोपेतच मृत्यू झाला, तरी त्याच्या कुटुंबियांना , पत्नीला समजलं नाही, तब्बल 13 तास ती पतीच्या मृतदेहासमोबत प्रवास करत होती.

अशा एक ना अनेक हादरवणाऱ्या घटना समोर येत असतानाच मध्य प्रदेशच्या इंदौरमध्येही अशीच एक हृदयद्रावक घटना घडली. कोचिंग क्लासमध्ये बसलेल्या एका विद्यार्थ्याचा सायलेंट हार्ट ॲटकने मृत्यू झाला.

क्लासमध्ये इतर विद्यार्थ्यांसोबत बसलेला तो तरूण अभ्यास करत असतानाच बघता-बघता बेंचवर धाडकन कोसळला. त्याला नेमकं काय झालं हे त्याच्या आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना कळलंच नाही. पण तो खाली कोसळला तो उठलाच नाही आणि ते पाहून क्लासमध्ये कल्लोळ माजला.

त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले पण तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्या तरूणाच्या घरात तर स्मशानशांतता पसरली आहे. तरूण मुलाच्या जाण्याचे कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे.

व्हिडीओ आला समोर

 

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण भंवरकुआन येथील आहे. राजा लोधी असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो सागरचा रहिवासी होता. राजा लोधी हा मध्यप्रदेश लोकसेवा आयोगाची तयारी करत होता. यासाठी त्याने इंदूरमध्ये खाजगी कोचिंग सेंटरही लावले होते. नेहमीप्रमाणे बुधवारी दुपारी राजा कोचिंग क्लासमध्ये शिकण्यासाठी आला आणि वर्गमित्रांसोबत जाऊन बसला. काही वेळ तो नीट बसला होता, पण अचानक त्याला काही होऊ लागलं आणि त्याच डोकं झुकंल. पाहता-पाहता तो बेशुद्ध पडला आणि बेंचवर कोसळला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -