Monday, May 27, 2024
Homeक्रीडाभारताची खराब सुरुवात,अँडरसनचा भेदक मारा

भारताची खराब सुरुवात,अँडरसनचा भेदक माराभारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात ( ENGvsIND 3rd test ) भारताचा कर्णधार विराट कोहलीला सरप्राईज मिळाले. त्याने अनेक दिवसांनी नाणेफेक जिंकली. विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराटने नाणेफेक जिंकल्यानंतर मी नाणेफेक जिंकली हेच मोठे आश्चर्य असल्याची प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात खराब झाली. जेम्स अँडरसनने पहिल्याच षटकात लॉर्ड्सवरील शतकवीर केएल राहुलला(K.L.Rahul) भोपळाही फोडू दिला नाही. त्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजाराचीही ( १ ) अँडरसननेच पाचव्या षटकात शिकार केली.

तिसऱ्या कसोटीत भारतीय संघात बदल होण्याची अपेक्षा जाणकार व्यक्त करत होते. त्यांना भारताचा अव्वल फिरकीपटू आर. अश्विनला संघात स्थान दिले जाईल असे वाटत होते. पण विराट कोहलीने विनिंग कॉम्बिनेसन न बदलण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ एक फिरकी गोलंदाज आणि तीन वेगवान गोलंदाज घेऊन मैदानात उतरला आहे.

रोहित – विराटचा डाव सावरण्याचा प्रयत्न

भारताच्या ५ षटकात २ बाद ४ धावा

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -