Friday, June 21, 2024
Homeआरोग्यविषयकतूपाचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहेत?

तूपाचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत?देसी तूप किंवा घी हे जवळ-जवळ प्रत्येक घरात वापरले जाते. काही लोक तूप घरी तयार करतात तर काही लोक त्याला बाहेरुन विकत घेतात. तसं तूप हे खूप महाग असतं, परंतु ते तुमच्या स्वयंपाकघरात ठेवलेला एक असा खजिना आहे, जो तुमचे आरोग्य समृद्ध करू शकतो. तूप खाल्ल्याने अनेक आजार बरे होऊ सकतात. हो तुम्ही बरोबर ऐकलात तूपामुळे तुम्ही अनेक आजारांपासून लांब राहू शकता. तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तूप चे काय फायदे आहेत?

डोळ्यांसाठी फायदेशीर
तूप हे तुमच्या डोळ्यांसाठी अमृत मानले जाते. जर तुम्ही तुमच्या आहारात रोज देसी तूप खाल्ले, तर ते तुमच्या डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. ज्यांना कमी दृष्टी आहे किंवा चष्मा आहे त्यांनी नियमितपणे याचे सेवन केले पाहिजे. जे तुमच्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर ठरेल. देसी तुपात असलेले अमीनो अ‍ॅसिड आणि फॅटी अ‍ॅसिड तुमच्या शरीरासाठी फायदेशीर आहेत.

कोलेस्टेरॉल(Colestrol) नियंत्रित करते
होय, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, पण तुप तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉल वाढण्यास प्रतिबंध करते. देसी तूप शरीरातील खराब कोलेस्टेरॉल काढून टाकते. देशी तूपात असलेले कोलेस्टेरॉल शरीराला हानी पोहोचवत नाही.

मात्र, तूप खाल्ल्यानंतर तुम्ही व्यायाम केलाच पाहिजे. जर तुम्हाला हृदयाशी संबंधित आजार असेल तर तुम्ही तूप घेण्यापूर्वी नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. देसी तूप खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. ज्या लोकांना हाडांशी संबंधित कोणताही आजार असेल, तर डॉक्टर त्यांनाही देसी तूप खाण्याचा सल्ला देतात.

तूप वजन कमी करण्यात कसे मदत करते?
तुपामध्ये मुबलक प्रमाणात पोषक घटक असतात, जे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असतातच, तसेच ते वजन कमी करण्यासाठी देखील मदत करतात. तुपात 99.9 टक्के चरबी, 1 टक्के चरबी विरघळणारे जीवनसत्वे असतात. तुपातील फॅटी अ‍ॅसिडची रचना समजून घेण्यासाठी एक अभ्यास करण्यात आला. तेव्हा त्यात असे आढळून आले की, तूप हा DHA (docosahexaenoic acid) चा चांगला स्रोत आहे. डीएचए सर्वात लोकप्रिय ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड आहे. हे आपल्या शरीरात बनत नाहीत, म्हणून ते आहाराद्वारे घेणे आवश्यक आहे.
हे घटक तुपात असतात
अक्रोड, फिश ऑइल आणि फ्लेक्ससीड हे ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडचे चांगले स्रोत आहेत. डीएचए, कर्करोग, हृदयविकाराचा झटका, इन्सुलिन प्रतिरोध, संधिवात आणि हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर सारख्या समस्यांचा धोका कमी करण्यास मदत करते.

ओमेगा 3 फॅट (डीएचए) आणि ओमेगा 6 (सीएलए) मध्ये समृद्ध आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हे खूप चांगले मानले जाते. ओमेगा 6 फॅट्स शरीरातील चरबी कमी करतात]

अशा प्रकारे वजन कमी होते
तुपामध्ये आवश्यक अमीनो अ‍ॅसिड असतात जे चरबी पेशींचा आकार कमी करतात. जर तुमच्या शरीरात चरबी जमा झाली असेल, तर तूप खाणे फायदेशीर ठरू शकते. याशिवाय, तुपामध्ये असलेले ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करतात.

तज्ञांच्या मते, दररोज एक किंवा दोन चमचे तूप खाल्ल्याने वजन नियंत्रित राहते. परंतु तूप दोन चमचे पेक्षा जास्त वापरू नये.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -