Tuesday, February 27, 2024
Homeइचलकरंजीवस्त्रनगरीवर धुक्याची चादर : प्रचंड गारठा मोठा काळोख

वस्त्रनगरीवर धुक्याची चादर : प्रचंड गारठा मोठा काळोख

वस्त्रनगरीवर धुक्याची चादर : प्रचंड गारठा मोठा काळोख

ताजी बातमी / ऑनलाइन टीम

इचलकरंजी आज मंगळवार दिनांक 23 रोजी पहाटेपासून मोठे धुके दाटून आले. याचबरोबर हवेत मोठा गारवा जाणवत होता आणि धूक्याचा काळोख इतका होता की समोरचे काही दिसतच नव्हते.

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने मोठे बदल होत आहेत. यामुळे कधी थंडी तर कधी अचानक उष्मा जाणवणे अशा गोष्टी सातत्याने होत आहेत. आज मंगळवारी सकाळी अचानक हवेत करता वाढला आणि प्रचंड काळोख दाटून येऊन मोठे धुके पडले.

परिणामी शहरातील मुख्य रस्त्यासह सांगली रोड, कोल्हापूर रोड, स्टेशन रोड, यासह नदीवेस मार्गे कर्नाटकाकडे जाणारा रस्ता या मार्गावरून ये जा करणाऱ्या वाहन धारकांबरोबरच व्यायामाबरोबरच इतर कामासाठी बाहेर पडणाऱ्या पादचारांनाही याचा सामना करावा लागला. वाहनांना अक्षरशः लाईट्स सुरू करूनच प्रवास करावा लागला.

दरम्यान वातावरणातील या अचानक बदलाचा शहर व परिसरातील वृद्ध तसेच लहान मुले यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -