Tuesday, February 27, 2024
Homeब्रेकिंगधुके कसे तयार होते? 

धुके कसे तयार होते? 

धुके हे एक दृश्य ढगासमान असते, ज्यात पाण्याचे किंवा बर्फाचे सूक्ष्म बिंदू असतात. पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा त्याजवळ हे हवेत लटकलेले असतात. त्यास एक खालील पातळीवर असणारा एक प्रकारचा ढग असेही म्हणता येते. जवळच्या पाण्याच्या स्रोतांचा, उंचसखलतेचा व वाऱ्याच्या वेगाचा यावर फार जास्त प्रभाव पडतो. धुक्याचा जहाज वाहतूक, प्रवास, विमानोड्डाणे व युद्धे यावरही बराच प्रभाव पडतो.सध्या सगळीकडे पावसाळ्यामुळे वातावरण थंडगार झाले आहे. काही ठिकाणी धुके पडते आहे.

धुक्याच्या दुलईत निसर्गाचे एक वेगळेच रूप दिसून येते. तुम्हाला माहिती आहे का, हे धुके कसे तयार होतेधुके हे एक दृश्य ढगासमान असते, ज्यात पाण्याचे किंवा बर्फाचे सूक्ष्म बिंदूअसतात. पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा त्याजवळ हे हवेत लटकलेले असतात. त्यास एक खालील पातळीवर असणारा एक प्रकारचा ढग असेही म्हणता येते.

जवळच्या पाण्याच्या स्रोतांचा, उंचसखलतेचा व वाऱ्याच्या वेगाचा यावर फार जास्त प्रभाव पडतो. धुक्यामुळे जहाज वाहतूक, प्रवास, विमानोड्डाण व युद्धे यावरही बराच प्रभाव पडतो. दृश्यता कमी असल्यामुळे अनेक विमानोड्डाणे रद्द केली जातात, तसेच महामार्गावरील वाहतुकीतही अडथळा निर्माण होतो. वाहने हळू चालवावी लागतात व प्रसंगी अपघातही घडतात. सहसा थंड वातावरण असताना धुक्याचे प्रमाण वाढते. विमानांत हायड्रोकार्बनी इंधन वापरले जात असल्यामुळे ज्वलनानंतर त्यातून बरेचसे जलबाष्प बाहेर पडते. हिमधुक्याला हे जलबाष्प पुरेसे असते.

अलास्का व उत्तर कॅनडा यांसारख्या प्रदेशांत अनेक महिने तापमान खूपच खाली जात असल्यामुळे व अशा परिस्थितीतून अनेक वेळा हिमकणयुक्त धुके निर्माण होत असल्यामुळे दैनंदिन कठीण समस्या उद्भवतात. डोंगराळ भागात, विस्तीर्ण सरोवरांच्या आसमंतात आणि समुद्र किनाऱ्यांच्या जवळच्या क्षेत्रात धुक्यांची संख्या जास्त असते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -