Saturday, July 27, 2024
Homeब्रेकिंगपहाटे ३ वाजेपासून रांग, भाविकांची मोठी गर्दी;अयोध्येत २ तासांतच मंदिर प्रवेश बंद

पहाटे ३ वाजेपासून रांग, भाविकांची मोठी गर्दी;अयोध्येत २ तासांतच मंदिर प्रवेश बंद

५०० वर्षांच्या इतिहास आणि कित्येक वर्षांच्या संघर्षाची स्वप्नपूर्ती होऊन अखेर अयोध्येत रामललाचं भव्य मंदिर उभारलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते येथील मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला अन् देशभरात दिवाळी साजरी झाली.गावागावात, शहरा-शहरात आणि महानगरातही उत्साह आणि आनंदात अयोध्येतील सोहळ्याचा उत्सव साजरा करण्यात आला. २२ जानेवारीला अयोध्या नगरी दुमदुमली, दिग्गजांची रांग अयोध्येत पाहायला मिळाली. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांच्या रामभक्तीचा मेळा शरयूतीरी जमला होता. रामललाच्या दर्शनासाठी सगळीकडे मोठी गर्दी पाहायला मिळाली.

 

भारताच्या इतिहासाला आणखी एक सुवर्ण अध्याय जोडला गेला. मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापासूनच रामभक्तांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली आहे. भाविकांची मोठी रांग अयोध्येत असून सैन्य दलाच्या तुकड्याही सुरक्षेसाठी तैनात आहेत. राम मंदिर लोकार्पणाच्या दुसऱ्या दिवशीपासूनच मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे, मोठी गर्दी भाविकांची दिसून आली. भाविकांच्या गर्दीमुळे सकाळी ७ वाजता दर्शन रांगेसाठी खुले झालेले मंदिर पाऊणे ९ वाजता बंद करण्यात आले. मंदिरात दर्शन घेऊन बाहेर जाण्यासाठीचा मार्ग तेवढा खुला ठेवण्यात आला होता.

 

मंदिराच्या सुरक्षेसाठी पॅरामिलिट्रीच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. बॅरिकेट्स लावून मंदिराकडील रस्ता बंद करण्यात आला आहे. सध्या मंदिरात भाविकांना प्रवेश करण्याचा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. पहाटे ३ वाजल्यापासूनच मंदिरातील रामललाच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगेत गर्दी केली होती. त्यामुळेमोठ्या संख्येने भाविक भक्त रामललाच्या दर्शन प्रतिक्षेत होते. सकाळी ७ वाजता दर्शनासाठी मंदिर रांग खुली करण्यात आली, त्यावेळी, भक्तांची मोठी गर्दी येथे पाहायला मिळाली. गर्दीला नियंत्रित करण्यासाठी रॅपिड एक्शन फोर्सला पाचारण करण्यात आले.

 

मंदिर परिसरात कोणत्या वस्तू घेऊन जाव्यात किंवा कोणत्या वस्तूंना बंदी आहे, याची माहिती भाविकांना नाही. तर, आजची गर्दी पाहाता मंदिर व्यवस्थापनाने ठेवलेली लॉकरची संख्या कमी पडत असल्याचं दिसून येत आहे. दर्शनासाठीची वेळ अद्याप निश्चित करण्यात आली असून दर्शनवेळ वाढविण्यात येईल, असेही बोलले जात आहे.

 

राम मंदिरासाठी मोठी देणगी

 

अयोध्येतील भव्य दिव्य राम मंदिराचे निर्माण कार्य पूर्णपणे रामभक्तांकडून देण्यात आलेल्या देणगीतून सुरू आहे. राम मंदिरासाठी देश आणि परदेशातील कोट्यवधी भक्तानी आपल्या क्षमतेनुसार देणगी दिली आहे. राम मंदिरासाठी कुठल्याही सरकारने एक पैसाही दिलेला नाही. हे मंदिरी पूर्ण पणे भक्त मंडळींनी देणगी स्वरुपात दिलेल्या पैशांतून उभे राहत आहे. या मंदिरासाठी सर्वात मोठी देणगी सुरतमधील एका हिरे व्यापाऱ्याने दिले आहे. तर, रामललाच्या मूर्तीसाठी सोन्याचा मुकूटही एका हिरे व्यापाऱ्यानेच अर्पण केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -