Monday, December 23, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजी विधानसभा मतदारसंघात नवीन 8668 मतदार वाढले

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात नवीन 8668 मतदार वाढले

 

आगामी लोकसभा निवडणूकीच्या(voters) पार्श्‍वभूमीवर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाची अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामध्ये नवीन 8668 मतदारांची भर पडली असून मतदारसंघात एकूण 2 लाख 97 हजार 77 इतकी मतदारसंख्या आहे. तर दुबार, मयत, स्थलांतरीत अशा 13 हजार 483 मतदारांना वगळण्यात आले आहे. मतदारसंघातील 254 मतदान केंद्रावर ही अंतिम यादी प्रसिध्द केली असून मतदारांनी आपली नांवे मतदार यादीत असल्याची खात्री करुन घ्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांनी केले आहे.

 

प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत(voters) प्रांताधिकारी चौगुले बोलत होत्या. त्या म्हणाल्या, विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 27 ऑक्टोबर 2023 ते 23 जानेवारी 2024 या कालावधीत राबविण्यात आला. 26 ऑक्टोबर 2023 अखेर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात 3 लाख 1 हजार 508 इतकी मतदारसंख्या होती.

 

पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत ऑक्टोबर2023 अखेर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात 3 लाख 1 हजार 508 इतकी मतदारसंख्या होती.

 

पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत ऑक्टोबर 2023 च्या प्रारुप मतदार यादीत 8668 मतदारांची नांव नोंदणी झाली असून 13 हजार 483 मतदारांची वगळणी करण्यात आली. त्यामुळे एकूण मतदारसंख्या 2 लाख 97 हजार 77 इतकी झाली आहे. त्यामध्ये 1 लाख 52 हजार 465 पुरुष, 1 लाख 44 हजार 552 महिला आणि 60 तृतीयपंथी इतकी मतदारांची संख्या आहे. यामध्ये 159 इतके सैनिकी मतदार आहेत.1 जानेवारी 2023 ते 14 जानेवारी 2024 अखेर 8668 इतक्या नवीन मतदारांची नोंदणी झालेली आहे. तर 13 हजार 483 इतकी नावे दुबार मतदार यादीतून वगळण्यात आलेली आहेत. घरोघरी भेटी दरम्यान न आढळलेले अथवा गैरहजर, दुबार नोंदणी, मयत, स्थलांतर अशा 7716 जणांना नोटीसा पाठविण्यात आल्या होत्या.

 

अंतिम यादी सर्वच 254 केंद्रांवर प्रसिध्द करण्यात आली असून मतदारांनी मतदार यादी तपासून आपल्या नांवाची खात्री करुन घ्यावी. तसेच काही सूचना असल्यास त्या त्या विभागाच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रांताधिकारी चौगुले यांनी केले आहे. विशेषत: विवाहित, स्थलांतरीत मतदारांनी आपल्या नांवाची नोंद करावी, मतदार नोंदणी अभियान सुरुच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -