अल्पबचत योजनांकडे भारतात सातत्याने लक्ष वेधले जात आहे. देशात असे अनेक लोक आहेत ज्यांना कोणताही धोका न पत्करता सुरक्षित योजनांमध्ये आपले पैसे गुंतवायचे आहेत, जिथे चांगले व्याज उपलब्ध आहे.पोस्ट ऑफिस च्या योजना वेगवेगळ्या उद्दिष्टांचा विचार करून अशा अनेक छोट्या बचत योजना देतात.
पण यामध्ये ज्येष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस) ही अशी योजना आहे, जिपवरील व्याजदर सर्वाधिक आहे. या योजनेची मॅच्युरिटी 5 वर्षांची आहे, म्हणजेच तुमचे पैसे फार दीर्घ कालावधीसाठी ब्लॉक केले जात नाहीत. विशेष म्हणजे तुम्ही तुमच्या आई-वडिलांच्या नावाने याची सुरुवात करू शकता. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील गुंतवणुकीवर प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 1.50 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर टॅक्स सवलत मिळू शकते.
व्याज आणि कमाल ठेव मर्यादा
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत एकाच खात्यातून पैसे जमा करण्याची कमाल मर्यादा 30 लाख रुपये आहे. यापूर्वी ही मर्यादा 15 लाख रुपये होती. अर्थसंकल्प 2023 मध्ये ही मर्यादा वाढवण्याची घोषणा करण्यात आली होती. तर, या योजनेत मिळणारे व्याज वार्षिक 8.2 टक्के आहे. या सरकारी योजनेत किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करता येते.
किती मिळणार परतावा?
* जास्तीत जास्त ठेव: 30 लाख रुपये
* व्याजदर : 8.2 टक्के वार्षिक
* मॅच्युरिटी पीरियड: 5 वर्षे* मासिक व्याज: 20,050 रुपये
* तिमाही व्याज: 60,150 रुपये
* वार्षिक व्याज: 2,40,600 रुपये
* पाच वर्षांतील एकूण व्याज : 12,03,000
* कुल रिटर्न: 42,03,000 लाख रुपये (30,00,000 रुपये + 12,03,000 रुपये)
पती-पत्नी स्वतंत्र खाते उघडू शकतात
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत अशी सुविधा आहे की, जर तुम्ही पती-पत्नी असाल तर तुम्ही 2 वेगवेगळी खातीही उघडू शकता. अशावेळी जास्तीत जास्त 60 लाख रुपये (एका खात्यात 30 लाख रुपये) 2 वेगवेगळ्या खात्यांमध्ये जमा केले जाऊ शकतात. साधारणपणे हे खाते वयाच्या 60 वर्षांनंतर उघडता येते. काही प्रकरणांमध्ये वयोमर्यादा 55-60 वर्षे असते.
2 खात्यांनी (अकाउंट्स) किती होणार फायदा?
* जास्तीत जास्त ठेव : 60 लाख रुपये
* व्याजदर : 8.2 टक्के वार्षिक
* मॅच्युरिटी पीरियड: 5 वर्षे
* मासिक व्याज: 40,100 रुपये
* तिमाही व्याज: 1,20,300 रुपये
* वार्षिक व्याज: 4,81,200 रुपये
* पाच वर्षांतील एकूण व्याज : 24,06,000
* एकूण रिटर्न: 84,06,000 लाख रुपये (60,00,000 रुपये + 24,06,000 रुपये)