Thursday, February 12, 2026
Homeब्रेकिंगBigg Boss 17 Grand Finale कुठे पाहता येणार?; विजेत्याला प्राईज मनी किती...

Bigg Boss 17 Grand Finale कुठे पाहता येणार?; विजेत्याला प्राईज मनी किती मिळणार? वाचा…

बिग बॉसच्या चाहत्यांसाठी आणि बिग बॉसच्या 17 व्या सिझनमधील स्पर्धकांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण आज बिग बॉसच्या 17 व्या सिझनचा ग्रँड फिनाले आहे. आज संध्याकाशी 6 वाजता हा फिनाले सुरु होईल. पुढे रात्री 12 वाजेपर्यंत हा शो चालणार आहे. रात्री 12 वाजता या शोचा विजेता घोषित होणार आहे. तसंच या शोच्या विजेत्याला ट्रॉफीसोबतच ठराविक रक्कमही मिळणार आहे. टॉप पाच फायनलिस्ट पैकी एकाच्या गळ्यात विजेत्यापदाची माळ पडणार आहे. हा शो तुम्हाला घर बसल्या पाहता येणार आहे. टीव्ही तसंच ऑललाईन प्लॅटफॉर्मवरही पाहायला मिळणार आहे.हा शो कुठे पाहता येणार?

बिग बॉस 17 चा ग्रँड फिनाले तुम्ही आज संध्याकाळी सहापासून कलर्स टीव्हीवर पाहू शकता. याशिवाय जिओ सिनेमा या अॅपवरही तुम्हाला पाहता येणार आहे. जिओ सिनेमावर नि:शुल्क तुम्हाला हा फिनाले पाहता येईल. या शो ला सलमान खान होस्ट करणार आहे. त्याच बरोबर भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया हे को- होस्ट असणार आहेत.

 

गेस्ट कोण असणार?

बिग बॉस 17 चा ग्रँड फिनाले होतो आहे. त्यामुळे या खास कार्यक्रमात खास पाहुणे उपस्थित असतील. माधुरी दीक्षित, सुनील शेट्टी, ऑरी यासोबतच इतरही सेलिब्रिटी उपस्थित असणार आहेत. हा शो सहा तास सलग चालणार आहे. तसंच बिग बॉस 17 या सिझनमधील सर्व स्पर्धकही या फिनालेला हजर राहतील. शिवाय बिग बॉस 17 चे चाहते या फिनालेसाठी उत्सुक आहेत.कोण जिंकणार?

मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे, अरुण महाशेट्टी, मन्नारा चोपडा आणि अभिषेक कुमार हे टॉप फायनलिस्ट आहेत. यांच्यातील एकजण या शोचा विजेता होईल. या विजेत्याला बिग बॉसच्या ट्रॉफीसोबतच 50 लाख रूपये देखील मिळणार आहेत. यात मनी बॅगचाही समावेश आहे. पण यंदाचा हा सिझन कोण जिंकणार? हे अद्यात स्पष्ट नाही. आज संध्याकाळपासून या फिनालेची धूम सुरु होईल. रात्री 12 वाजेच्या सुमारास या सिझनच्या विजेत्याच्या नावाची घोषणा होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -