उत्तर भारतात लागोपाठ तीन पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने त्या भागात झोतवार्यांचा प्रभाव वाढला आहे. काश्मिरात पावसासह हिमवर्षाव सुरू होण्याची शक्यता असल्याने फेब्रुवारीची सुरुवात कडाक्याच्या थंडीने होईल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.यंदा उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीचा मुक्काम गेले दीड महिना असून यंदा प्रथमच त्या भागात सतत दाट धुके अन् कडक थंडीने मोठा मुक्काम ठोकला आहे. सततच्या थंडीने तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान तीन चक्रवातांनी काश्मिरमध्ये हिमवर्षावाची शक्यता असून महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात थंडी तीव्र होण्याची शक्यता आहे.
सोमवारचे किमान तापमान..
जळगाव 11.3, पुणे 13.7, नगर 12.5, कोल्हापूर 17.9, महाबळेश्वर 15.2, मालेगाव 14.2, नाशिक 12.5, सांगली 16.8, सातारा 15.7, सोलापूर 17.1, धाराशिव 16.1, छत्रपती संभाजीनगर 15.9, परभणी 14.4, नांदेड 16.6, अकोला 15.1, अमरावती 13.7, बुलढाणा 15, चंद्रपूर 12,गोंदिया 11.6, नागपूर 12.8, वाशिम 14.4, वर्धा 13.6, यवतमाळ 15.2