Sunday, August 10, 2025
Homeब्रेकिंगBudget 2024: टॅक्स स्लॅब जैसे थे, मात्र 'त्या' नोकरदारांना 7 लाखांपर्यंत Income...

Budget 2024: टॅक्स स्लॅब जैसे थे, मात्र ‘त्या’ नोकरदारांना 7 लाखांपर्यंत Income Tax नाही; अर्थमंत्र्यांची घोषणा

ताजी बातमी ऑनलाईन टीम 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधीच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये नोकरदार वर्गाला मोठी भेट दिली आहे. नव्या करप्रणालीनुसार आयकर भरणाऱ्यांना 7 लाखांपर्यंत कोणताही आयकर देण्याची गरज नसल्याची तरतूद यापुढेही कायम राहणार असल्याची महत्त्वाची घोषणा निर्मला सितारमण यांनी केली आहे. हा करदात्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. या व्यक्तीरिक्त कररचनेमध्ये म्हणजेच टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

निवडणुकीआधी करदात्यांना मोठा दिलासा दिला जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र नवीन करप्रणालीनुसार कर भरणाऱ्यांना यापूर्वीच देण्यात आलेला 7 लाखांपर्यंत करमुक्तीचा निर्णय वगळता इतर करदात्यांना कोणताही नवीन दिलासा यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये देण्यात आलेला नाही. 2023-24 च्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेल्या रचनेनुसारच आयकर आकारला जाणार आहे.

Income Tax

0 ते 3 लाख 0 %

3 ते 6 लाख 5 %

6 ते 9 लाख 10 %

9 ते 12 लाख 15 %

12 ते 15 लाख 20 %

15 लाखांपेक्षा जास्त 30 %

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -