चालू आठवड्यात भारतीय शेअर बाजारात मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारने आपला अंतरिम अर्थसंकल्प सादर केला केला आहे. हे देखील एक कारण आहे, ज्यामुळे शेअर बाजारात उत्साह पाहायला मिळत आहे.या अर्थसंकल्पात सरकारने देशातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी 11.11 लाख कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. Salasar Exteriors Share Price
त्यामुळे इन्फ्रा सेक्टरमधील दिग्गज कंपन्याच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या सालासर एक्सटेरियर्स अँड कॉन्टूर कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ पाहायला मिळत आहे. आज शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी सालासर एक्सटीरियर कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के वाढीसह 32 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सालासर एक्सटीरियर कंपनीच्या शेअर्सने अवघ्या 15 दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्के परतावा कमावून दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सालासर एक्सटेरियर्स अँड कॉन्टूर कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 30.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. यासह सालासर एक्सटेरियर्स अँड कॉन्टूर कंपनीने कर्जमुक्त झाल्याची घोषणा केली आहे. मागील काही दिवसांपासून या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी निर्माण झाली आहे.15 जानेवारी 2024 रोजी सालासर एक्सटेरियर्स अँड कॉन्टूर कंपनीचे शेअर्स NSE निर्देशांकावर 20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 1 फेब्रुवारी रोजी या कंपनीचे शेअर्स 30 रुपये किमतीवर पोहोचले होते. मागील 15 दिवसांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के परतावा कमावून दिला आहे.
- सालासर एक्सटेरियर्स अँड कॉन्टूर ही कंपनी मुख्यतः सुरक्षित आणि नाविन्यपूर्ण उपायांसह पायलिंग काम, सिव्हिल वर्क, सुपर स्टील आणि स्ट्रक्चरल वर्क, इंटीरियर वर्क, हार्ड फिनिशिंग, फर्निचर वर्क आणि इलेक्ट्रिकल आणि प्लंबिंग, फायर फायटिंग या सारखे काम करण्याचा व्यवसाय करते. सालासर एक्सटेरियर्स अँड कॉन्टूर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 35.08 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 18.65 रुपये होती.