मित्रानो, WhatsApp हे प्रसिद्ध सोशल मीडिया अँप नक्कीच तुमच्या मोबाईल मध्ये असेल. आधी फक्त चॅटिंग आणि फोटो विडिओ शेअर करण्यासाठी व्हाट्सअप चा वापर केला जात होता. परंतु आता बदलत्या टेक्नॉलॉजी मुळे WhatsApp वरून सुद्धा आपण अनेक वेगवेगळी कामे करू शकतो. एवढच नव्हे तर एकेमेकांना पैसेही पाठवू शकतो. त्यामुळे जगभरात व्हाट्सअपचे करोडो यूजर्स आहेत. परंतु जस जस तंत्रज्ञान पुढे पुढे जात आहे तस तस काही समाजकंठक लोकांकडून तंत्रज्ञानाचा गैरवापर सुद्धा सुरु आहे. अनेकदा आपण व्हाट्सअप अकाउंट हॅक झाल्याचे ऐकलं असेल. तुमच्यासोबतही असं काही होऊ नये यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. तसेच कोणत्या चुकीमुळे तुमचं व्हाट्सअप अकाउंट हॅक होऊ शकते ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहोत.करू नका या चुका – WhatsApp Hack
मित्रानो, जेव्हा तुम्ही व्हाट्सअप वापरत असता तेव्हा ते सतत अपडेट करा किंवा अपडेटेड व्हर्जनचाचा वापर करा. जर तुम्ही याबाबत निष्काळजी असाल आणि तुम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष्य केले तर तुमचे व्हाट्सअप अकॉउंट हॅक होण्याचे हे मुख्य कारण बनू शकते. व्हाट्सअप खाते अपडेटेड नसेल तर हॅकरला अकाउंट हॅक (WhatsApp Hack) करण्यासाठी आयत कोलीत मिळत. आणि एकदा तुमचं अकाउंट हॅक झालं तर तुमचे सर्व मेसेज आणि कॉन्टॅक्ट नंबर सदर हॅकर कडे जाऊ शकतात.
वास्तविक, व्हॉट्सॲप वापरकर्त्यांसाठी वेळोवेळी नवीन अपडेट्स सादर केले जातात. जेव्हा तुम्ही वव्हाट्सअप अपडेट करता तेव्हा त्यात ऍड झालेले नवनवीन फीचर्स तुमची सुरक्षितता वाढवतात. आपल्या युजर्सची सुरक्षितता राहावी यासाठी व्हॉट्सॲप कडून वेळोवेळी प्ले स्टोअरवरून ॲप अपडेट करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच तुम्ही ऍक्सेस गमावला तरीही मोबाईल नंबर च्या माध्यमातून तुम्ही पुन्हा लॉग इन करू शकता. त्यामुळे तिथेही चिंता करण्याची गरज नाही.