भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून आपले नाव मागे घेतल्याने सर्वच आश्चर्यचकित झाले होते. कोहलीच्या या निर्णयामागे नेमकं कारण काय आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले गेले.मध्यंतरी अशा चर्चा झाल्या कि कोहलीची आई आजारी असलयाने त्याने सुट्टी घेतली मात्र आता विराट कोहलीचा मित्र आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलिअर्सने (AB de Villiers) यामागील कारण सांगितलं आहे. ते ऐकून तुम्हीही खुश व्हाल…. डिव्हिलिअर्सच्या मते विराटची पत्नी अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे .
विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये आरसीबी फ्रँचायझीसाठी एकत्र खेळले आहेत. त्यामुळे दोघांची दोस्तीही चांगली आहे. एबी डिव्हिलियर्सने त्याच्या यूट्यूब चॅनलवर विराटबाबत माहिती देताना सांगितलं कि, विराट कोहली दुसऱ्यांदा बाबा होणार आहे, त्यामुळे तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. मी त्याला मेसेज केला, तेव्हा मला हे समजलं. परंतु मला याबद्दल फारशी माहिती नाही. सध्या तो आपल्या कुटुंबासोबत अधिकाधिक वेळ घालवत आहे. विराट सध्या बरा असून लवकरच तो दुसऱ्यांदा बाबा होणार आहे, विराटने अगदी योग्य निर्णय घेतला असं एबी डिव्हिलियर्स म्हणाला.
दरम्यान, विराट आणि अनुष्का शर्माने २०१७ मध्ये लग्न केले होते. हे लग्न अगदी कमी लोकांच्या उपस्थिती इटलीत हा लग्नसोहळा पार पडला होता. देशातील सर्वात प्रसिद्ध कपल मध्ये विराट आणि अनुष्काची गणना होते. नेहमीच कोणत्या ना कोणत्याकारणाने ते चर्चेत असतात. २०२१ मध्ये या दोघांना वामिका नावाची तीन वर्षांची मुलगी सुद्धा आहे. आता अनुष्का दुसऱ्यांदा आई बनणार (Anushka Sharma Pregnant) असल्याने विराटच्या चाहत्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.