Thursday, January 2, 2025
Homeअध्यात्मबुध ग्रहाच्या अस्ताने वाढणार अडचणी; 'या' राशींचा वाईट काळ सुरु होण्याची शक्यता

बुध ग्रहाच्या अस्ताने वाढणार अडचणी; ‘या’ राशींचा वाईट काळ सुरु होण्याची शक्यता

बुध, बुद्धिमत्ता देणारा आणि ग्रहांचा राजकुमार एका ठराविक काळानंतर राशीमध्ये बदल करतो. यावेळी बुध ग्रह गोचर प्रमाणे अस्त आणि उदय बदलतो. ज्योतिषशास्त्रानुसार, यावेळी बुध मकर राशीत आहे.फेब्रुवारी महिन्यात बुध त्याच राशीत अस्त होणार आहे.

 

बुध ग्रहाच्या अस्तामुळे काही राशींना विशेष लाभ मिळू शकतो, तर अनेक राशींच्या अडचणी वाढू शकतात. बुध 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:22 वाजता अस्त होणार आहे आणि 11 मार्च रोजी संध्याकाळी 7:17 पर्यंत अस्त स्थितीत राहणार आहे. अशा परिस्थितीत काही राशीच्या लोकांनी सावध राहणं आवश्यक आहे. जाणून घेऊया बुध ग्रहाच्या अस्तामुळे कोणत्या राशींना काळजी घ्यावी लागणार आहे.

 

मेष रास (Mesh Zodiac)

 

बुधाच्या अस्तामुळे या राशीच्या लोकांनी थोडे सावध राहणं आवश्यक आहे. वेतनवाढ आणि पदोन्नतीसाठी तुम्हाला अजून थोडी वाट पहावी लागणार आहे. नोकरीशी संबंधित कोणताही निर्णय थोडा विचार करूनच घ्या. कोणतेही पैसे उधार देणे टाळावं. अन्यथा पैसे बुडू शकतात. वरिष्ठांशी कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून मतभेद होऊ शकतात. आर्थिक नुकसान होण्याची चिन्हे आहेत. व्यवसायातही काही नुकसान होऊ शकते. कामाच्या ठिकाणी थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. मिथुन रास (Mithun Zodiac)

 

या राशीमध्ये बुध अष्टम भावात अस्त होणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना आर्थिक, कौटुंबिक आणि आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागणार आहे. यासोबतच तुमचा बिझनेस पार्टनरशिपमध्ये असेल तर तुम्हाला थोडी काळजी घेण्याची गरज आहे. तुम्हाला व्यवसायात स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते. कामाचा ताण जास्त असेल, ज्यामुळे तुम्ही थोडे तणावात राहू शकता. सहकाऱ्यांसोबत काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतो. आर्थिक नुकसान देखील होऊ शकते. अनावश्यक खर्चामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.

 

सिंह रास (Leo Zodiac)

 

या राशीमध्ये बुध पाचव्या भावात अस्त होणार आहे. या राशीच्या लोकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. पैशाशी संबंधित कोणतीही निष्काळजीपणा टाळावी. काही जुने आजार उद्भवू शकतात. परदेशात नोकरीच्या संधी मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी थोडे सावध राहण्याचा प्रयत्न करा. कुटुंबात काही मुद्द्यावरून मतभेद होऊ शकतात. एखाद्या गोष्टीबद्दल तणावग्रस्त राहूशकता. बुध ग्रहामुळे तुमच्या घरात काही समस्या निर्माण होऊ शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -