केवळ दहावी उत्तीर्ण असल्याने चांगल्या पद आणि पगाराची नोकरी मिळत नाहीय? मग काळजी करु नका. कारण महावितरणमध्ये दहावी उत्तीर्णांना चांगल्या पगाराची नोकरी उपलब्ध झाली आहेमहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत शिकाऊ उमेदवारांना संधी मिळणार आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.
या अंतर्गत वीजतंत्री/तारतंत्री आणि कोपा पदांच्या एकूण 26 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी आमि आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 9 फेब्रुवारी 2024 पासून याची अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांना 18 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. महावितरणची अधिकृत वेबसाइट http://www.mahadiscom.in वर याचा तपशील देण्यात आला आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्यास, खोटी माहिती भरल्यास, दिलेल्या मुदतीनंतर अर्ज आल्यास तो बाद करण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्या.
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
कस्टम्समध्ये दहावी उत्तीर्णांना नोकरी
मुंबई कस्टम्स अंतर्गत कार चालक पदाच्या एकूण 28 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. दहावी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात. उमेदवाराला वाहन चालक पदाचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच ड्रायव्हिंग परवाना असलेल्या उमेदवारांनाच ही नोकरी मिळू शकते. चालक पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज सीमाशुल्क उपायुक्त (कार्मिक व आस्थापना), कार्यालयाचे प्र. चीफ कमिशनर ऑफ कस्टम्स, न्यू कस्टम हाऊस, बॅलार्ड इस्टेट,मुंबई- 400001 या पत्त्यावर ऑफलाइन माध्यमातून पाठवायचे आहेत. 20 फेब्रुवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.