Sunday, December 22, 2024
Homeसांगलीशेडबाळ येथे ऊस ट्राॅली पलटली; रस्त्याच्या बाजूने निघालेल्या तीन शेतमजूर महिला ठार

शेडबाळ येथे ऊस ट्राॅली पलटली; रस्त्याच्या बाजूने निघालेल्या तीन शेतमजूर महिला ठार

शेडबाळ (ता. कागवाड) येथे कागवाडहून उगार साखर कारखान्याकडे ऊस घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटल्याने रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या तीन शेतमजूर महिला ठार तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. दुर्घटना रविवारी दुपारी १२च्या सुमारास घडली. या घटनेची नोंद कागवाड पोलिसांत झाली असून, उपनिरीक्षक एम. बी. बिरादार यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.

 

मृतांत चंपा लखाप्पा तळकट्टी (वय ४२), भारतीय वडराळे (३८), मालू रावसाहेब ऐनापुरे (५३) यांचा समावेश आहे. तर शेकवा नरसप्पा नरसाई (४५) या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांची स्थिती चिंताजनक आहे. या घटनेमुळे कागवाड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, कागवाडहून उगार कारखान्याकडे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर (केए ७१ टी १९२५) ट्रॉलीचे चाक तुटल्याने ती रस्त्यावरून जाणाऱ्या शेतमजूर महिलांवर उलटली. त्यात तिघी ठार व एक गंभीर जखमी झाली.

 

शेतातून काम करून घरी परतताना त्यांना मृत्यूने कवटाळल्याने कागवाड तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे. अपघातातील मयत महिला दररोज मजुरीसाठी उन्हाळा असल्याने सकाळी लवकर जाऊन दुपारी बारा वाजता परतत होत्या. घटनास्थळी मृतांच्या कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

 

अपघाताचे वृत्त समजताच नागरिकांनी तत्काळ जेसीबी मागवून मृतांना बाहेर काढले. अपघातातील तिन्ही मृत महिलांच्या मागे पती, मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -