प्रत्येक ग्रहांचा गोचर कालावधी हा निश्चित आहे. त्यानुसार ग्रह प्रत्येक राशीत भ्रमण करत असतात. सूर्य हा महिनाभर एका राशीत ठाण मांडून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. अशा वेळेला तो त्याही राशीत महिनाभर गोचर करत असतो.सूर्याच्या या मार्गक्रमणाला ज्योतिषशास्त्रात संक्रांची संबोधले जाते.
आता एका वर्षानंतर पुन्हा सूर्यदेव कुंभ राशीत येणार आहेत. १३ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजून ३१ मिनिटांनी सूर्य कुंभ राशीत प्रवेश करेल. ही रासही शनिची असून खुद्द शनिदेव सुद्धा या राशीत सध्या विराजमान आहेत. त्यामुळे सूर्य आणि शनिची युती होणार आहे. पित्रापूत्र असले तरी या दोघांचं एकमेकांशी पटत नाही. त्यामुळे महिनाभर काही गोष्टींचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे काही राशींनी महिनाभर तरी सांभाळून राहणं गरजेचं आहे. चला जाणून घेऊयात सूर्य गोचरानंतर कोणत्या सर्वाधिक त्रास होईल ते..
सिंह : सिंह राशीच्या सप्तम स्थानात सूर्य आणि शनिची युती होत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे. पार्टनरशिपच्या व्यवसायात तसेच पत्नीसोबत वाद होण्याची दाट शक्यता आहे. तसेच विनाकारण काही गोष्टींवर पैसा खर्च करावा लागेल. व्यवसायात आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकते. फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या.
वृश्चिक : या राशीला शनिची अडीचकी सुरु आहे. त्यात शनि आणि सूर्याची युती होणार असल्याने डोकेदुखी वाढेल. नोकरी करणाऱ्या करणाऱ्या जातकांना महिनाभर तरी अनेक समस्यांना सामोरं जावं लागेल. दिलेलं टार्गेट पूर्ण करताना दमछाक होईल. आर्थिक स्थितीबाबत बोलायचं तर हाती पैसा टिकणार नाही. उत्पन्नापेक्षा खर्चाचं प्रमाण अधिक असेल. बेसिक गरजा पूर्ण करताना अडचण येईल.
कर्क : शनिची अडीचकी कर्क राशीच्या लोकांना सुरु आहे. जितके प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न कराल तितके ते अधिक वाढतील. नोकरी करणाऱ्या लोकांना या कालावधीत अडचणींचा सामना करावा लागेल. शनि आणि सूर्याची अष्टम स्थानात युती होणार आहे. त्यामुळे एक महिन्याच्या कालावधीत मानसिक त्रासाला सामोरे जावे लागेल. सहकार्यांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनातही अडचणींचा डोंगर उभा राहील.