Sunday, December 22, 2024
Homeराशी-भविष्य७ मार्चला बुध उदयासह ‘या’ ३ लोकांचा होणार भाग्योदय? माता लक्ष्मी कृपेने...

७ मार्चला बुध उदयासह ‘या’ ३ लोकांचा होणार भाग्योदय? माता लक्ष्मी कृपेने मिळू शकते अपार धन श्रीमंती

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह आणि नक्षत्र एका ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदलतो. ग्रहांचा राजकुमार बुध लवकरच आपली स्थिती बदलणार आहे. बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, संवाद, गणित, हुशारी आणि मैत्रीचा दाता बुध उदय होणार आहे. जेव्हा कधी बुध आपली स्थिती बदलतो तेव्हा काही राशींचे नशिब सूर्यासारखं चमकतं. ७ मार्च २०२४ मध्ये बुधदेव मीन राशीत उदय स्थितीत येणार आहे. त्यामुळे काही राशींचं भाग्य चमकण्याची शक्यता आहे. चला मग बुधदेवाताची तुमच्या राशीवर कृपा होणार का, जाणून घेऊया…

 

मार्चपासून चमकेल ‘या’ ३ लोकांचं भाग्य?

कन्या राशी

कन्या राशीच्या लोकांसाठी बुध उदय भाग्यशाली ठरु शकतो. या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ झाल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती बदलू शकते. तुमच्या आतापर्यंतच्या कठोर परिश्रमाला यश या काळात यश मिळण्याची शक्यता आहे. या काळात सामाजिक आणि व्यावसायिक प्रतिष्ठा वाढू शकते. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना या काळात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. तसंच तुम्ही पैसे बचत करण्यात यशस्वी होऊ शकता.

कुंभ राशी

बुध उदय कुंभ राशीसाठी वैवाहिक जीवनात आनंद आणि सुख घेऊन येणारं ठरु शकतं. नोकरी-व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. यावेळी तुम्हाला अडकलेले पैसे मिळू शकतात. परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. या काळात नशीब तुमच्या बाजूने असण्याची शक्यता आहे. तुमचं बँक बॅलन्सही वाढण्याची शक्यता आहे. या राशीतील लोक या काळात मोठा प्रवास करू शकतात, ज्यातून फायदा होऊ शकतो. कुटुंबातील वातावरण आनंदी राहण्याची शक्यता आहे.

 

मकर राशी

मकर राशीच्या लोकांसाठी बुधाचा उदय फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. व्यावसायिकांना मोठी रक्कम मिळू शकते. या काळात तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो. जर तुम्ही व्यापारी असाल तर तुम्हाला यावेळी चांगला आर्थिक नफा मिळू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तसेच बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात. वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी येण्याची शुभ शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -