equity fund :जगभरात सुरू असलेल्या प्रवाहाप्रमाणे देशांतर्गत भांडवली बाजारात मोठ्या प्रमाणावर अस्थिरता आणि अनिश्चिततेचे वातावरण असूनही समभागसंलग्न अर्थात इक्विटी म्युच्युअल फंडात जानेवारीमध्ये २१,७८० कोटींचा विक्रमी ओघ आला.जगभरात सुरू असलेल्या प्रवाहाप्रमाणे देशांतर्गत भांडवली बाजारात मोठ्या प्रमाणावर अस्थिरता आणि अनिश्चिततेचे वातावरण असूनही समभागसंलग्न अर्थात इक्विटी म्युच्युअल फंडात जानेवारीमध्ये २१,७८० कोटींचा विक्रमी ओघ आला.SIP
Paytm वरून मिळवा कुठल्याही गॅरंटीशिवाय २ मिनिटात २ लाखांपर्यंत कर्ज (instant Personal Loan 2024)
ही गेल्या दोन वर्षांतील उच्चांकी पातळी आहे, अशी माहिती म्युच्युअल फंडाची शिखर संस्था असलेल्या ‘ॲम्फी’ने गुरुवारी दिली.गुंतवणूकदार स्मॉल कॅप फंडांकडे सर्वाधिक आकर्षित होत आहेत, असे ‘ॲम्फी’ने स्पष्ट केले. या आधी डिसेंबर महिन्यात इक्विटी फंडामध्ये १७,००० कोटींची गुंतवणूक आली होती. :equity fund
नियोजनबद्ध गुंतवणुकीची पद्धत अर्थात ‘एसआयपी’च्या माध्यमातून होणारी महिनागणिक गुंतवणूकदेखील उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. डिसेंबरच्या १७,६१० कोटी रुपयांच्या तुलनेत जानेवारीमध्ये या माध्यमातून म्युच्युअल फंडांमध्ये १८,८३८ कोटी रुपयांची गुंतवणूक आली. जानेवारीत ५१.८४ लाख नवीन ‘एसआयपी’च्या नोंदणींसह, एकूण एसआयपी खात्यांनी ७.९२ कोटींचा टप्पा गाठला आहे.
म्युच्युअल फंड हा गुंतवणूक पर्याय सर्वतोमुखी करणाऱ्या नियोजनबद्ध गुंतवणुकीच्या अर्थात ‘एसआयपी’ पद्धतीची लोकप्रियता उत्तरोत्तर वाढते आहे.याआधी जानेवारी २०२२ मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडात २८,४६३ कोटी रुपयांचा सर्वाधिक ओघ होता. सलग ३५ व्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडात सकारात्मक प्रवाह राहिला आहे.
ट्रॅक्टरसाठी आता 5 लाखांचे अनुदान! असा करा अर्ज :Tractor Anudan Yojana
या श्रेणीमध्ये थीमॅटिक फंडांच्या माध्यमातून ४,८०५ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली, त्यापाठोपाठ स्मॉल-कॅप फंडांमध्ये ३,२५७ कोटी आणि मल्टी-कॅप फंडांमध्ये ३,०३९ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. तर या महिन्याचे वैशिष्ट्य म्हणजे लार्ज-कॅप श्रेणीमध्ये १,२८७ कोटी रुपयांचा निधी प्रवाहित झाला, जो १३ महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर आहे. सलग चौथ्या महिन्यात स्मॉल-कॅप फंडांनी ३,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त निव्वळ प्रवाह मिळवला आहे.रोखे बाजाराकडेही ओढा
इक्विटी म्युच्युअल फंड योजनांबरोबर रोखेसंलग्न योजनांमध्येदेखील ७६,४६९ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. सलग दोन महिन्यांतील निर्गमनानंतर हे सकारात्मक वळण घेतले गेले आहे. त्याआधीच्या डिसेंबर २०२३ मध्ये ७५,५६० कोटी आणि नोव्हेंबर महिन्यात ४,७०७ कोटी रुपयांचा निधी काढून घेण्यात आला होता. equity fund
याचबरोबर हायब्रिड योजनांमध्ये २०,६३७ कोटी रुपयांचा प्रवाह दिसून आला.एकंदरीत, म्युच्युअल फंड उद्योगाने डिसेंबर २०२३ मधील ४०,६८५ कोटींच्या निर्गमनानंतर, सरलेल्या जानेवारी महिन्यात १.२३ लाख कोटींचा नक्त ओघ पाहिला आहे. म्युच्युअल फंड उद्योगाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) डिसेंबरमधील ५०.७८ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत जानेवारी-अखेर ५२.७४ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.