Thursday, March 13, 2025
HomeBlogपाणी योजनेचा वीज पुरवठा तोडणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करा : आ. प्रकाश आवाडे

पाणी योजनेचा वीज पुरवठा तोडणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करा : आ. प्रकाश आवाडे

इचलकरंजी :

इचलकरंजी शहरासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार्‍या मजरेवाडी येथे काही विघ्नसंतोषी गुंडप्रवृत्तीच्या लोकांकडून योजनेचा वीज पुरवठा खोडसाळपणाने खंडीत करण्यासह वीजेच्या तारा तोडण्याचे प्रकार केले जात आहे. त्यामुळे इचलकरंजीचा पाणी पुरवठा विस्कळीत होऊन नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी समाज कंटकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रकाश आवाडे यांनी जिल्हा पोलिसप्रमुखांकडे पत्राद्वारे केली आहे.

इचलकरंजी : ‘त्या’ तलाठ्याला पोलीस कोठडी

पत्रात, इचलकरंजी शहरासाठी मजरेवाडी (ता. शिरोळ) येथून कृष्णा नदीतून उपसा करून इचलकरंजीस पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जातो. त्यासाठीच मुख्य जलवाहिनी शिरढोण, टाकवडे या गावातून इचलकरंजी फिल्टर हाऊसपर्यंत आणली आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या जलवाहिनीला काही गुंड प्रवृत्तीच्या समाजकंटकांकडून विरोध केला आहे. त्याच कारणातून मजरेवाडी जॅकवेलसाठीचा वीज पुरवठा वारंवार तोडला जात आहे. अशाप्रकारांमुळे योजना केंद्रातील वीज खंडीत होत असल्यामुळे पाण्याचे बॅक प्रेशरमुळे जलवाहिनीला सतत गळती लागत आहे.

युनियन बँक ऑफ इंडियामध्ये जम्बो भरती, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी, थेट..

परिणामस्वरुप इचलकरंजी शहरातील पाणी पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागून नाहक त्रास सोसावा लागत आहे. जलवाहिनीची गळती, वीजेच्या तारांची वारंवार दुरूस्ती यामुळे पाणीपुरवठ्याच्या खर्चात प्रचंड प्रमाणात वाढ होऊन इचलकरंजी महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे.

बजाज फायनान्स: 50 हजार रुपये Personal loan मिळवा! परतफेड ८ वर्षात करा !

त्यामुळे मजरेवाडी येथून आणलेल्या जलवाहिन्यांसह वीजेच्या तारांचे नुकसान करणार्‍या खोडसाळपणे वारंवार वीज पुरवठा खंडीत करणार्‍या गुंड प्रवृत्तीच्या समाजकंटकांचा शोधून घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे आमदार आवाडे यांनी म्हटले आहे. या पत्राच्या प्रती पोलिस उपअधिक्षक, महानगरपालिका आयुक्त व कुरुंदवाड पोलिस ठाणे यांनाही देण्यात आल्या आहेत.

राशिभविष्य : शुक्रवार दि. 9 फेब्रुवारी 2024 : Horscope Today

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -