Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंगअरे देवा, पुन्हा अवकाळीचे संकट, राज्यातील या भागांत ‘यलो अलर्ट’

अरे देवा, पुन्हा अवकाळीचे संकट, राज्यातील या भागांत ‘यलो अलर्ट’

राज्यात यंदा मॉन्सूनने सरासरी गाठली नाही. सरासरी न गाठता यंदा मॉन्सूनने निरोप घेतला. त्याचा परिणाम खरीप पिकांवर झाला. यंदा खरीपचे उत्पादन कमी झाले. तसेच रब्बीची लागवड कमी झाली. कारण राज्यातील अनेक प्रकल्पांमध्ये जलसाठा नव्हता. यामुळे रब्बीसाठी पाण्याचे आवर्तन दरवर्षीप्रमाणे सोडता आले नाही. राज्यातील धरणांमध्ये जलसाठा कमी असल्यामुळे जुलै महिन्यापर्यंत पाण्याचा वापर करावा लागणार आहे. आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे.

यामुळे वातावरण बदलले आहे. त्याचा त्रास नागरिकांना सुरु झाला आहे. त्याचवेळी हवामान विभागाने चिंता वाढवणारी बातमी दिली आहे. नागपूरसह विदर्भात पुढील तीन दिवस वादळी पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट दिला आहे.काय आहे हवामान विभागाचा इशारा

नागपूरसह विदर्भात पुढील तीन दिवस पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. ११, १२ आणि १३ फेब्रुवारीसाठी हा अलर्ट दिला आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने पुढील तीन दिवस वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे रब्बी पिकांचे नुकसान होणार आहे. अवकाळी पावसामुळे रब्बीतील गहू, काढणीला आलेला हरभरा, तूर पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

का पडणार पाऊस

मध्य भारतात तयार झालेल्या सायक्लॅामीक सर्क्यूलेशनमुळे विदर्भात वादळी पावसाचा अंदाज आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये 10 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीदरम्यान रिमझिम पाऊस पडू शकतो. 10 आणि 11 फेब्रुवारीला महाराष्ट्र आणि ओडिशामध्ये पाऊस पडेल. याशिवाय उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये 12 ते 15 फेब्रुवारीदरम्यान पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस

पश्चिम बंगालमध्ये १३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान पाऊस पडू शकतो. 10 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान, पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तामिळनाडूमध्ये १२ आणि १३ फेब्रुवारीला, तेलंगणामध्ये १० आणि ११ फेब्रुवारीला आणि केरळमध्ये १४ ते १५ फेब्रुवारीदरम्यान हलका पाऊस पडू शकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -