Sunday, December 22, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजीत दहशत माजवत वाहनांची तोडफोड : दहा जणांच्यावर गुन्हा

इचलकरंजीत दहशत माजवत वाहनांची तोडफोड : दहा जणांच्यावर गुन्हा

इचलकरंजी वेताळ पेठेतील रोहन पारशे या तरुणावर झालेल्या खुनी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी तरुणाच्या जमावाने मोठे तळ्यावरील पोवार गल्लीमध्ये दहशत माजवत वाहनांची मोडतोड करत दोघांना जखमी केले. याबाबत इचलकरंजी पोलीस ठाण्यामध्ये दहा जणांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरच्या घटनेवरून इचलकरंजी मध्ये पुन्हा एकदा फाळकुट दादांच्या टोळक्याने डोके वर काढल्याचे स्पष्ठ होत आहे.

युझर्ससाठी फोल्डेबल iPhone! Apple चा प्लॅन तरी काय, जाणून घ्या

इचलकरंजी येथील वेताळ पेठ येथे शुक्रवारी रात्री रोहन पारसे या तरुणावर खुनी हल्ला झाला होता. सदर हल्ल्यातील तरुण हे मोठे तळे परिसरातील असल्याचे पारसे याच्या मित्रांना समजल्यानंतर पारसे समर्थकांनी मोठे तळ्यावरील पवार गल्लीमध्ये हातामध्ये काठ्या लाठया ने मोडतोड करत धुमाकूळ घातला.

युझर्ससाठी फोल्डेबल iPhone! Apple चा प्लॅन तरी काय, जाणून घ्या

यावेळी हेरवाडे यांच्या दारातील दोन रिक्षासह इतर वाहनांची जमावाने मोड तोड करत प्रचंड दहशत माजवली होती. या तोडफोडीत सुमारे 65 हजार रुपयांचे नुकसान झालें आहे.

इचलकरंजी : सायझिंग उद्योग आंदोलनाबाबत उद्या मुंबईत तोडगा बैठक

सदर मोडतोडीस मज्जाव करण्यास आलेल्या हरि हेरवाडे आणि प्रसाद शिंदे यांना मारहाण करत जखमी केले आहे. याप्रकरणी हरि हेरवाडे यांनी गावभाग पोलीस ठाण्यामध्ये इंद्रसिंग गोसावी, जेकब तडाखे, आकाश तडाखे, आर्यन वाघमारे यांच्यासह १० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून हल्लेखोरा पैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.

बँक ऑफ बडोदा देत आहे 20 ते 25 लाख पर्सनल लोन : BOB Personal Loan

दरम्यान खुनी हल्ल्यातील जखमी पारसे याला सांगली येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले असून रात्री उशिरापर्यंत पारशे याच्या वरील खूनी हल्ल्याबाबत कोणतीही नोंद झालेली नव्हती.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -