इचलकरंजी बस स्थानकामध्ये गर्दीचा फायदा घेत महिलांच्या दागिन्यावर शनिवारी चोरट्याने डल्ला मारला असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांची संख्या वाढवण्याची महिला प्रवाशातून मागणी होत आहे.
इचलकरंजी : सायझिंग उद्योग आंदोलनाबाबत उद्या मुंबईत तोडगा बैठक
महाराष्ट्र शासनाच्या वतीने महिलांसाठी एसटी महामंडळाचा प्रवास करण्यासाठी असणाऱ्या तिकीट दरामध्ये सवलत दिल्यामुळे सध्या एसटी ने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या प्रचंड वाढली आहे. या गर्दीच्या फायदा घेऊन चोऱ्या करणाऱ्यांचे प्रमाणही वाढल्याचे दिसत आहे.
इचलकरंजीत दहशत माजवत वाहनांची तोडफोड : दहा जणांच्यावर गुन्हा
गर्दीचा फायदा घेत महिलांच्या अंगावर असणाऱ्या दागिन्यावर चोरटे राजरोसपणे डल्ला मारत आहेत. असाच प्रकार इचलकरंजी कागल मार्गावर बस मधून प्रवास करणाऱ्या दोन महिलांच्या बाबतीत घडला.
स्वस्त सोने घ्यायचे असेल तर पैसे ठेवा तयार; मोदी सरकारची सुवर्ण योजना ‘या’ तारखेला होणार सुरू
रांगोळी येथील ज्योती संजय बेनाडे वय 33 या महिलेचे ३० हजार रूपयें किमतीचे मनी मंगळसूत्र कापडी पिशवीतून चोरून नेले आहे तर कागल मार्गावरील हुपरी कडे जाणाऱ्या विद्या अरुण कांबळे या पन्नास वर्षीय महिले दीड तोळे वजनाच्या सोन्याच्या पाटल्या एकूण ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला आहे.
मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल
याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांनी खचाखच भरलेली गर्दी म्हणजे चोरट्यांसाठी लाभदायक ठरत आहे एसटीतील गर्दीचा फायदा घेत दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून यामध्ये महिलांच्या दागिन्यावर डल्ला मारून चोर पसार होत आहेत.
गुंतवणुकीसाठी शेअर्सची शोधाशोध थांबवा; कमाईसाठी तज्ज्ञांनी सूचवलेली यादी पहा :Top 6 Shares In Focus
याबाबत पोलिसांनी बस स्थानकावरील पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.