Wednesday, February 5, 2025
Homeब्रेकिंग3 रुपयांच्या शेअरने गुंतवणूकदार मालामाल! 10 हजारांचे झाले 16 लाख

3 रुपयांच्या शेअरने गुंतवणूकदार मालामाल! 10 हजारांचे झाले 16 लाख

शेअर बाजारात असे अनेक स्टॉक आहेत, जे गुंतवणूकदारांना अवघ्या काही वर्षातच करोडपती करतात. या शेअरमध्ये काही स्वस्तातील शेअरचा पण समावेश आहे. अगदी एक ते 20 रुपयांतील काही शेअर गुंतवणूकदारांचे नशीब उघडतात. या कंपनीने पण गुंतवणूकदारांना अशीच लॉटरी लावली आहे.

रेफ्रिजरेटर गॅस रिफिल करणाऱ्या या कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना 16,000 टक्क्यांचा परतावा दिला आहे. गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिला आहे.रेफेक्स इंडस्ट्रीजची धमाल

रेफेक्स इंडस्ट्रीजने ही धमाल केली आहे. रेफेक्स इंडस्ट्रीजच्या (Refex Industries) शेअरने गेल्या 10 वर्षांत गुंतवणूकदारांना 16 हजार टक्क्यांचा बंपर रिटर्न दिला. गेल्या एका महिन्यात या शेअरमध्ये 9 टक्क्यांहून अधिकची उसली आली आहे. तर गेल्या तीन महिन्यात या शेअरमध्ये 29 टक्क्यांची तेजी दिसून आली.10 हजारांचे झाले 16 लाख

जर एखाद्या गुंतवणूकदारांनी 10 वर्षांपूर्वी या शेअरमध्ये 10 हजार रुपये गुंतवले असते तर आज त्या रक्कमेवर 16 लाख रुपयांचा रिटर्न मिळाला असता. 2013 मध्ये या शेअरची किंमत 3 रुपयांच्या जवळपास होती. आता हा शेअर 680 रुपयांच्या स्तरावर पोहचला आहे. तज्ज्ञांच्या मते, या शेअरमध्ये येत्या वर्षात तेजी दिसू शकते. या शेअरने सातत्याने जोरदार रिटर्न दिला आहे. या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणारे मालामाल झाले आहेत.

किती महसूल, फायदा किती

सप्टेंबरच्या तिमाही आकड्यांनुसार, कंपनीला ऑपरेशन्समधून तिमाही आधारावरील महसूलात 8 टक्क्यांची घसरण झाली. हा महसूल 352 कोटी रुपये होता तर नफ्यात किंचित वाढ होऊन तो 21.43 कोटी रुपयांवर पोहचला. विश्लेषकांच्या मते, बेंचमार्क इंडेक्सपेक्षा हा शेअर चांगली कामगिरी दाखवेल. टेक्निकल चार्टमध्ये पण तो उजवा ठरला आहे. आठवड्याच्या कसोटीवर त्याची कामगिरी जोरदार आहे. तज्ज्ञांच्या मते 644 रुपयांचा स्टॉप लॉससह 760 ते 800 रुपयांपर्यंत हा स्टॉक उसळी घेईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -