Wednesday, March 12, 2025
Homeब्रेकिंगवडिलांच्या आरोपावर रविंद्र जडेजा संतापला.. `माझ्या पत्नीची इमेज...`

वडिलांच्या आरोपावर रविंद्र जडेजा संतापला.. `माझ्या पत्नीची इमेज…`

टीम इंडियाचा स्टार खेळाडू रवींद्र जडेजाने आपल्या क्रिकेट कारकिर्दिची 15 वर्षे पूर्ण केली. सध्या तो दुखापतग्रस्त असल्याने आंतरराष्ट्रीय सामन्यांपासून दूर असला तरी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या माध्यमातून अॅक्टीव्ह राहतोय.दरम्यान वडील अनिरुद्ध सिंग यांनी त्याच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे तो पुन्हा चर्चेत आलाय.

रवींद्र आणि सून रिवाबा यांच्याशी आपला संबंध नसल्याचे सांगितले होते. यानंतर आता रवींद्र जडेजा चांगलाच संतापलाय आहे. काय घडलंय हे प्रकरण? सविस्तर जाणून घेऊया.रवींद्र जडेजाची पत्नी आणि भाजपची आमदार रिवाबावर तिच्या सासऱ्यांनी गंभीर आरोप लावले. पत्नीमुळे माझा मुलगा माझ्यापासून दूर झाल्याचा आरोप सासऱ्यांनी केल होता. दरम्यान या सर्व गोष्टी निरर्थक असल्याचे जडेजाने म्हटले होते. ही मुलाखत स्क्रिप्टेड होती. त्यामुळे फॅन्सनी याकडे दुर्लक्ष करावे असे आवाहन रवींद्र जडेजाने केले होते. दरम्यान आता त्याची प्रतिक्रिया समोर आली आहे.जडेजाला आम्ही क्रिकेटर बनवले नसते तर बरे झाले असते, असे त्याचे वडील सांगतात.

त्याची पत्नी रिवाबाला हिला केवळ पैसाच दिसतोय. यामुळे तिने रविंद्रला आमच्यापासून दूर केल्याचा आरोप जडेजाच्या वडिलांनी केला होता.माझ्याकडे माझ्या वडिलांविषयीदेखील खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. मात्र त्या न सांगितलेल्याच बऱ्या असे जडेजाने आपल्या मुलाखतीत सांगतिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -