Wednesday, September 27, 2023
Homeक्रीडाएबी डिव्हिलियर्सची निवृत्तीची घोषणा, आयपीएलमध्येही खेळणार नाही

एबी डिव्हिलियर्सची निवृत्तीची घोषणा, आयपीएलमध्येही खेळणार नाही


दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज एबी डिव्हिलियर्सने क्रिकेटला अलविदा केला आहे. एबी डिव्हिलियर्सने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, पण आता या दिग्गज खेळाडूने फ्रेंचायझी क्रिकेटलाही अलविदा म्हटले आहे. म्हणजेच आता एबी डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये खेळणार नाही, तसेच तो बिग बॅश, पीएसएल किंवा इतर कोणत्याही लीगमध्ये खेळताना दिसणार नाही.

एबी डिव्हिलियर्सने सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा केली आहे. डिव्हिलियर्सने लिहिले की, ‘माझा प्रवास खूप छान होता, आता मी क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी माझ्या घरामागे माझ्या मोठ्या भावांसोबत खेळायला सुरुवात केली आणि तेव्हापासून आजपर्यंत मी हा खेळ खूप एन्जॉय केला आहे. आता वयाच्या 37 व्या वर्षी ती आग पूर्वीसारखी धगधगत नाही

एबी डिव्हिलियर्सने सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा केली. संन्यासाबाबतच्या ट्विटमध्ये डिव्हिलियर्सने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये हिंदीत धन्यवाद लिहिले आहे. डिव्हिलियर्सने लिहिले की, “माझा प्रवास खूप छान होता, आता मी क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी माझ्या घरामागे माझ्या मोठ्या भावांसोबत खेळायला सुरुवात केली होती आणि तेव्हापासून आजपर्यंत मी हा खेळ खूप एन्जॉय केला आहे. आता वयाच्या 37 व्या वर्षी ती आग इतक्या वेगाने किंवा पूर्वीसारखी धगधगत नाही.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र