Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगतरुणाने मागून अचानक येत वृद्धाच्या डोक्यात केले वार; खूनाची घटना CCTVत कैद

तरुणाने मागून अचानक येत वृद्धाच्या डोक्यात केले वार; खूनाची घटना CCTVत कैद

कोल्हापूरमध्ये करवीर तालुक्यातील कुडित्रे इथं भरचौकात एका तरुणाने वृद्धाचा डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून निर्घृण खून केला. रविवारी सकाळी ही घटना घडली असून या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ आता समोर आला आहे.मारहाणीनंतर संशयित हल्लेखोर रतन बाळासो भास्कर हा घटनास्थळावरून पळून गेला. तर जम्बा भगवंत साठे वय वर्षे ६५ यांचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जम्बा साठे हे गावातील चौकात गावकऱ्यांसोबत बोलत उभा राहिले होते. त्यावेळी अचानक रतन भास्कर हा हातात लाकडी दांडके घेऊन आला. काही कळायच्या आतच त्याने जम्बा साठे यांच्या डोक्यावर वार केला. यावेळी जम्बा साठे खाली पडले. त्यानंतरही रतन भास्करने दांडक्याने वार सुरूच ठेवले. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं जम्बा साठे जागीच गतप्राण झाले.

रतन भास्कर मारहाण करत असताना सुरुवातीला तिथे असलेल्यांनी त्याच्या हातातले लाकडी दांडके काढून घ्यायचा आणि त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. पण रतनला घाबरून तिथून पळ काढला. रतन भास्कर खून केल्यानंतर तिथून एका शेतकऱ्याची दुचाकी घेऊन फरार झाला.

रतन भास्कर हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. त्याच्यावर दहा वर्षांपूर्वी बलात्काराचा गुन्हाही दाखल झाला होता. तसंच गांजा आणि दारुचं व्यसनही असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिलीय. या घटनेची माहिती मिळताच करवीर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर हल्लेखोराला अटक केल्याशिवाय मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. शेवटी पोलीसांनी नातेवाईकांची समजूत काढून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -