अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याने राज्यातील राजकारण ढवळून निघालय. त्याचवेळी भाजपासोडून गेलेला एक नेता पक्षात पूनर्प्रवेशासाठी पडद्यामागून जोरदार प्रयत्न करतोय. भाजपाच्याच राज्यातील बड्या नेत्याने हा दावा केला आहे. दरम्यान अशोक चव्हाण आज दुपारी भाजपात प्रवेश करतील अशी माहिती आहे.सध्या अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे.
काल अशोक चव्हाण यांनी अचानक विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्याशिवाय काँग्रेस सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा दिला. अशोक चव्हाण मागच्या काही दिवसांपासून भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. आता हा अंदाज प्रत्यक्षात येताना दिसतोय.
अशोक चव्हाण आज दुपारी भाजपात प्रवेश करतील अशी माहिती आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याने काँग्रेसमधील अंतर्गत खदखद बाहेर आलीय. अशोक चव्हाण यांच्याप्रमाणे अजूनही काही आमदार नाराज असून ते पक्षाला सोडचिठ्ठी देतील असं बोलल जातय. अशोक चव्हाण हे एक मोठ नाव आहे. त्यांनी महाराष्ट्राच मुख्यमंत्रीपद भूषवलय. त्याशिवाय नांदेड जिल्ह्यातील ते एक वजनदार नेते आहेत. अशा नेत्याच्या पक्षप्रवेशामुळे आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजपा अजून बळकट होणार आहे.अशोक चव्हाण यांच्यानंतर आणखी एक दुसरे मोठे नेते भाजपात पूनर्प्रवेशासाठी सक्रीय झाल्याची माहिती आहे.
एकनाथ खडसे हे भाजपात प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करत असल्याच बोलल जातय. एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असून ते विधान परिषदेत आमदार आहेत. एकनाथ खडसे हे देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात मंत्री होते. विविध खात्याच्या मंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्यावर होती. पण त्यांच्यावर आरोप झाल्याने खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर एकनाथ खडसे बाजूला फेकले गेले. अखेर सततच्या दुर्लक्षामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
‘वरुन त्यांची हॉटलाईन असले, तर लावावी’आता एकनाथ खडसे यांचे भाजपात पूनर्प्रवेश मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी हा दावा केला आहे. “अगदी जोर लावून प्रयत्न सुरु आहेत असं मला कळतय. दिल्ली-राज्याकडून मला कळलय. मला अजून विचारणा झालेली नाही. मला विचारायच म्हटलं, तर कोणी विचारलेलं नाही. मी छोटा कार्यकर्ता आहे. वरुन त्यांची हॉटलाईन असले, तर लावावी. वरुन सिग्नल मिळाला तर मग काय?” असं गिरीश महाजन म्हणाले.