Monday, December 23, 2024
Homeराजकीय घडामोडीमुख्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यामुळे शहरातील तगडा बंदोबस्त अनेक मार्ग ऐकरी

मुख्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यामुळे शहरातील तगडा बंदोबस्त अनेक मार्ग ऐकरी

पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुचना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(visit) यांच्यासह अर्धे मंत्रीमंडळ शुक्रवारपासून दोन दिवसांच्या कोल्हापूरात आहे. या पार्श्वभूमीवर पोलीसांनी तगडा बंदोबस्त नेमला आहे. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी गुरुवारी महासैनिक दरबार येथे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन बंदोबस्ताच्या सुचना केल्या. शहर वाहतूक नियंत्रण विभागाने वाहतूक मार्गात बदल केले असून वन वे व पार्किंगचे नियोजनही केले आहे.

शिवसेनेचे महाअधिवेशन कोल्हापूर शहरात होणार असल्याने पोलीसांनी नेटका बंदोबस्त नेमला आहे(visit). जवळपास एक हजार पोलीस बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत. मुख्यमंत्री तसेच अनेक मंत्री शुक्रवारी सकाळी कोल्हापुरात येणार आहेत. महासैनिक दरबार येथे हे अधिवेशन होणार आहे. लाईन बाजार ते सर्किट हाऊस चौक या मार्गावरून जाणारी येणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद व चालू ठेवण्यात येणार आहे.मार्ग बंद व चालू

व्हिआयपी कॅन्वॉय रस्यावरून जाताना सर्किट हाऊस ते ताराराणी सिग्नल चौक,हायवे कॅन्टीन,सायबर चौक,हॉकी स्टेडीयम, इंदिरासागर, नंगीवली चौक, पाण्याचा खजीना, सिध्दाळा गार्डन, गांधी मैदान या मार्गावरील वाहतूक थांबवली जाणार आहे. शनिवारी गांधी मैदानवर सभा असल्याने येथे जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे.

एकेरी मार्गाचा वापर..

नंगीवली चौक ते स्वामी समर्थ मंदिर या रोडवरील सर्व वाहतूक ऐकरी केली आहे. कॅन्वाय जाताना दोन्ही बाजूने वाहतूक थांबवली जाणार आहे. इंदिरा सागरकडे जाणारी वाहतूक भूमी अभिलेख कार्यालयापासून डावीकडे वळवून सोयीनुसार पुढे मार्गस्थ होईल.

वन वे मार्ग शिथील करणे

दुर्गा चौक ते खॉसाब पुतळा हा ऐकरी मार्ग व्हिव्हीआयपी व व्हिआयपी यांचे मोटार वाहन ताफ्याकरीता येणे, जाण्यासाठी खुला करण्यात आला आहे. मिरजकर तिकटी ते बिनखांबी गणेश मंदिर हा रस्ता काही तासांसाठी खुला केला आहे.

नो पार्किग झोन

दूर्गा चौकापासून, मिरजकर तिकटी, दैवज्ञ बोर्डीग ते खरी कॉर्नर, गांधी मैदान या परिसरात नो पार्किंग झोन केला आहे.

येथे पार्किग उपलब्ध

कागल,गारगोटीकडून येणाऱ्या वाहनधारकानी निर्माण चौक,कसबा बावडा तावडे हॉटेलकडून येणाऱ्या वाहनधारकांसाठी प्रायव्हेट हायस्कुल,रत्नगिरी गगनबावडा येथून येणाऱ्या वाहनधारकांना पेटाळा,दूधाळी मैदान येथे वाहने उभे करता येतील.असा आहे बंदोबस्त

पोलीस अधीक्षक १

अप्पर पोलीस अधीक्षक २

पोलीस उपअधीक्षक ६

पोलीस निरीक्षक २१

एपीआय,उपनिरीक्षक ६५

पोलीस कर्मचारी ९५०

वाहतूक पोलीस कर्मचारी – ७५

होेमगार्ड जवान ५५०

राज्य राखवी दलाच्या २ तुकड्या

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -