Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगवस्तू खरेदी करुनही मनस्ताप! ॲमेझॉनसह फ्लिपकार्टने रिप्लेसमेंट पॉलिसी बदलवली

वस्तू खरेदी करुनही मनस्ताप! ॲमेझॉनसह फ्लिपकार्टने रिप्लेसमेंट पॉलिसी बदलवली

जर तुम्ही देशातील मोठ्या ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर, ॲमेझॉनसह फ्लिपकार्टवरुन सामान, वस्तू खरेदी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. या दोन्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने त्यांच्या Replacement Policy मोठा बदल केला आहे. त्यामुळे तुम्ही खरेदी केलेली एकादी वस्तू खराब जर झाली तर तुम्हाला आता ती लागलीच बदलवून मिळणार नाही. तुमच्या डोक्याला विकतचा ताप होणार आहे. वस्तू विकत घेऊन ती बदलण्यासाठी मनस्ताप होईल, काय झाला आहे बदल? जाणून घ्या..ॲमेझॉनसह फ्लिपकार्टने केला मोठा बदल

ॲमेझॉनसह फ्लिपकार्ट या दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या डिजिटल रिप्लेसमेंट पॉलिसीत बदल केला आहे. या कंपन्यांनी 7 दिवसात वस्तू बदल करण्याची योजना बंद केली आहे. पूर्वी या कंपन्या खराब अथवा भलतंची वस्तू पाठविल्यास ती बदलवू देत होती. त्याऐवजी ॲमेझॉन फ्लिपकार्टने आता सर्व्हिस सेंटरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे तुम्हाला खराब वस्तू बदलायची असेल तर सर्व्हिस सेंटर हुडकून तिथे वस्तू द्यावी लागेल. त्यानंतर नवीन उत्पादन येईपर्यंत या सेवा केंद्राच्या फेऱ्या माराव्या लागतील.

ग्राहकांना आता घर बसल्या सामान, वस्तू बदलण्याची सुविधा मिळणार नाही. ॲमेझॉनसह फ्लिपकार्टने हा नियम बदलल्यामुळे त्याचा मोठा फटका ग्राहक सेवेवर होईल. माल, उत्पादन दुय्यम निघाल्यास ग्राहकांना पैसे मोजून मनस्ताप सहन करावा लागणार आहे. या दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर 7 Days Replacement मध्ये बदल करत 7 Days Service Centre Replacement असा बदल केला आहे.

आता वस्तू बदल अवघडजर तुम्ही ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरुन एखादी डिजिटल वस्तू, उत्पादन खरेदी केल्यास, त्यात स्मार्टफोन, स्मार्टवॉच, इयरबड्स खरेदी केल्यास, तुमच्या जवळचे सर्व्हिस सेंटर कुठे आहे, त्याची माहिती घेऊन ठेवा. जर हे उत्पादन खराब निघाले तर तुम्हाला तात्काळ सेवा केंद्रावर जाऊन त्यासंबंधीची तक्रार करता येईल आणि हे उत्पादन कधी मिळणार याची माहिती घेता येईल. पण या धोरणामुळे ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागणार हे नक्की.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -