पेटीएम(Paytm) ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट बँकेला दणका दिला आहे. अनेक अनियमितता समोर आल्याने ही कारवाई करण्यात आली होती. आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पेटीएम बँक सोडून इतर 32 बँकांची फास्टटॅगसाठी अधिकृत बँक म्हणून मान्यता दिली आहे.
एनएचएआयने अधिकृत बँकेकडूनच FASTag खरेदीचा सल्ला दिला आहे. पेटीएमच्या(Paytm) दोन कोटी ग्राहकांना यामुळे बँक बदलावी लागणार आहे. फास्टटॅगने 32 बँकांची यादी जहीर केली आहे. त्यातील कोणत्याही बँकेकडून तुम्हाला फास्टटॅग खरेदी करता येईल.RBI ने पेटीएमवर अनेक प्रकारचे प्रतिबंध लावले आहेत. 29 फेब्रुवारीनंतर पेमेंट बँकेमध्ये ग्राहकांना रक्कम जमा करता येणार नाही.
11 मार्चनंतर ग्राहक जोडण्याची प्रक्रिया बंद होईल ग्राहकांना सध्या बँकेतून रक्कम काढण्यास परवानगी आहे. पण बँकिंग सेवा अवघ्या महिना भरातच ठप्प होईल. बँकेवर सर्वात मोठा ठपका मनी लाँड्रिंगचा करण्यात येत आहे. तर केवायसी न करता अनेक बँक खाती सुरु करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यात 1,000 हून अधिक बँक खाती केवळ एकाच पॅन कार्ड आधारे उघडण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते.
अंमलबजावणी संचालनालयाने पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयच्या कारवाईनंतर बँकेच्या मोठ्या अधिकाऱ्यांची चौकशी केली. त्यांनी अनेक कागदपत्रं सुद्धा घेतली. गुरुवारी याविषयीची माहिती समोर आली. केंद्रीय एजन्सी परदेशी मुद्रा प्रबंधन अधिनियम अंतर्गत फिनटेक कंपनीमध्ये अनियमिततेची चौकशी करण्यात येत आहे. मनी लाँडरिंग विरोधी अधिनियमातंर्गत पेटीएमची चौकशी आधीपासूनच सुरु आहे.
आरबीआयच्या कारवाईनंतर गेल्या शुक्रवारी पेटीएमच्या शेअरमध्ये मोठी पडझड दिसून आली होती. तर पेटीएमच्या शेअरमध्ये 36% घसरण झाली होती. या कंपनीचे बाजारातील मूल्य 2 अब्ज डॉलरने घसरले होते. या घसरणीनंतर आज, 16 फेब्रुवारी रोजी पेटीएमच्या शेअरमध्ये तेजीचे सत्र दिसले. आज पेटीएमचा शेअर 0.20 टक्क्यांनी वाढून 325.70 रुपयांवर व्यापार करत होता. गेल्या पाच दिवसांत या शेअरमध्ये 21 टक्क्यांची घसरण दिसून आली.