Monday, December 23, 2024
Homeराशी-भविष्यअसा असतो धनु राशीचा स्वभाव, ‘या’ तीन राशीच्या लोकांबरोबर अजिबात पटत नाही

असा असतो धनु राशीचा स्वभाव, ‘या’ तीन राशीच्या लोकांबरोबर अजिबात पटत नाही

राशी चक्रातील १२ राशींच्या लोकांचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. प्रत्येक राशीच्या व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वात फरक दिसून येतो. आज आपण धनु राशीच्या लोकांविषयी जाणून घेणार आहोत. धनु राशीचे लोक साधे आणि सरळ असतात. धार्मिक गोष्टींमध्ये त्यांना आवड असते. अन्यायाविरुद्ध ते नेहमी आवाज उठवतात. चुकीच्या गोष्टींना ते कधीही प्रोत्साहन देत नाही. वादविवाद करण्यातही ते मागे कधीही नसतात.अशावेळी त्यांच्या मुखातून असे काही शब्द बाहेर पडतात, ज्यामुळे इतरांना दु:ख पोहचू शकते.

स्वत:चे कौतुक करायला प्रत्येकाला आवडते पण या लोकांची नेहमी इच्छा असते की समोरच्यांनी त्यांचे खूप कौतुक करावे किंवा त्यांच्याविषयी चांगले बोलावे. या राशीच्या लोकांचे काही विशिष्ट राशींच्या लोकांबरोबर अजिबात पटत नाही.धनु राशीच्या लोकांनी वृश्चिक, वृषभ आणि कर्क राशींच्या लोकांबरोबर नाते जपताना नेहमी काळजी घ्यावी. या लोकांचे विचार त्यांना पटत नाही. आज आपण त्या विषयीच जाणून घेणार आहोत.

 

वृश्चिक

धनु राशीचे लोक नेहमी इतरांचे विचार ऐकून निर्णय घेतात पण वृश्चिक राशीच्या लोकांना तेज स्वभावामुळे कोणाचाही सल्ला स्वीकारण्याची सवय नसते. स्वत:ला वाचवण्यासाठी ते इतरांना त्रास सुद्धा देऊ शकतात. या लोकांच्या कटू शब्दांमुळे अनेकदा इतरांचे मन दुखावते. धनु राशीच्या लोकांना असा स्वभाव अजिबात पटत नाही.

 

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांना छोट्या छोट्या गोष्टींसाठी समोरच्याला सल्ला देण्याची सवय असते ज्यामुळे अनेकदा समीक्षक म्हणून वावरताना दिसतात. धनु राशीचे लोक अनावश्यक सल्ले देणे टाळतात. वृषभ राशीच्या लोकांना खूप विचारपूर्वक नाते संबंध निर्माण करण्याची सवय असते कारण या लोकांना कोणाकडून फसवणूक झालेली सहन होत नाही. अनेकदा धनु राशीच्या लोकांना त्यांची ही गोष्ट आवडत नाही.

कर्क

कर्क राशीचे लोक मनमिळावू स्वभावाचे असतात आणि या लोकांना फिरायला जाणे खूप आवडते. अशात जर कर्क राशीच्या लोकांची मैत्री धनु राशीच्या लोकांबरोबर असेल तर त्यांचे अनेकदा पटत नाही त्यामुळे ते एकमेकांना सहकार्य करत नाही. व्यव्हार करताना त्यांच्यामध्ये वादविवाद होतात. जर या राशीचे लोक बहिण भाऊ असेल तर छोट्या छोट्या गोष्टींवरुन यांच्या नात्यात वाद दिसून येते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -