दंगल’ फेम अभिनेत्री सुहानी भटनागरचं निधन झालं आहे. १९व्या वर्षी सुहानीने या जगाचा निरोप घेतला आहे. तिच्या निधनाने चाहत्यांना धक्का बसला असून बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सुहानीने ‘दंगल’ सिनेमातआमिर खानची मुलगी असलेल्या छोट्या बबिताची भूमिका साकारली होती.गेल्या काही दिवसांपासून सुहानीवर फरीदाबाद येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते.
तिच्या पायाला फ्रॅक्चर होतं. उपचार सुरू असतानाच तिला औषधांमुळे रिएक्शन होऊन शरीरात संपूर्ण पाणी झाल्याची माहिती दैनिक भास्करने दिली आहे. उपचारादरम्यानच शुक्रवारी(१६ फेब्रुवारी) रात्री तिचं निधन झालं. शनिवारी (१७ फेब्रुवारी) फरीदाबाद येथे तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.दंगल’ सिनेमातून सुहानीने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं होतं. तिच्या अभिनयाने सगळ्यांची मनं जिंकली होती. पण, ‘दंगल’ सिनेमानंतर ती सिनेसृष्टीपासून दूर होती. सोशल मीडियावरही ती फारशी सक्रिय नव्हती.