Tuesday, September 16, 2025
Homeकोल्हापूरउद्धव ठाकरे दिसतात तसे नाही, पत्राबाबत बोलताना CM एकनाथ शिंदे यांनी केला...

उद्धव ठाकरे दिसतात तसे नाही, पत्राबाबत बोलताना CM एकनाथ शिंदे यांनी केला मोठा गौप्यस्फोट

कोल्हापूरमधील महा अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. ठाकरे गटाकडून शिंदे गटाच्या आमदारांवर 50 खोके एकदम ओके अशी टीका केली. याचाच धागा पकडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 50 कोटी मागितल्याच्या एका पत्राबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. नेमकं कोणी पाठवलं होतं? आणि पत्रात नेमकं काय म्हटलं होतं? याबाबत एकनाथ शिंदे यांनी जाहीरपणे भाष्य केलं आहे.काय म्हणाले एकनाथ शिंदे?

आमच्यावर फक्त आरोपच आरोप करत आले आहेत आरोप करण्याचा अधिकार तुम्हाला आहे का पन्नास खोके 50 खोके सर्व नेते मंडळी समोर आहेत. शिवसेना सोडून इतर पक्षातील नेते आपल्याकडे येत आहेत. आपल्याला जेव्हा शिवसेना मिळाली तेव्हा यांच्या पायाखालची वाळू घसरली धडकी भरली. तुमची आम्हाला संपत्ती नको बाळा साहेब हीच आमची संपत्ती आहे. धनुष्यबान मिळाल्यावर शिवसेनेच्या खात्यातून 50 कोटी आम्हाला मिळाला पाहिजे असे पत्र आम्हाला पाठवलं. यांना बाळासाहेबांची विचार नको त्यांना 50 कोटी देऊन टाकले. 50 कोटी मागताना तुम्हाला जनाची नाही तरी मनाची पाहिजे होती रोज तुम्ही कसे आरोप करताय, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

 

उद्धव ठाकरे दिसतात तसे नाही, त्यांच्या चेहऱ्यामागे अनेक चेहरे लपले आहेत. तुमच्यावर आलेली संकट मी छातीवर घेतली आहेत. माझ्याकडे खूप गोष्टी आहे, ज्या वेळेला बोलायची वेळ येईल त्यावेळी मी बोलेल. बाळासाहेब असताना मातोश्री पवित्र मंदिर होतं आता मातोश्री उदास झाली आहे.

जिथे वाघाची डरकाळी येत होते तेथे आता रडण्याचा आवाज येतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले.दरम्यान, ज्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी रक्ताचे पाणी केलं पाकिस्तानची मॅच होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी वानखेडे स्टेडियम तोडून टाकलं. ही शिवसेना कार्यकर्ते आहेत अशी कार्यकर्ते किती आहेत, जेलमध्ये गेलेलो शिवसेना अशीच मोठी झाली नाही रक्ताचे पाणी केलं लोकांनी घरावर तुळशीपत्र ठेवले. आयत्या पिठावर रेगाट्याही नीट मारता आल्या तुम्हाला, मनोहर जोशींना भर व्यासपीठावरून उतरवण्याचं काम तुम्ही केलं. कदमांचा मनोहर पंत करायचा होता. नारायण राणे, राज ठाकरे असतील त्यांनी काय मागितले होते तुम्हाला यांचा त्रास होता, असं म्हणत शिंदेंनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -